esakal | नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट, फक्त ५ जण पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट, फक्त ५ जण पाॅझिटिव्ह

नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट, फक्त ५ जण पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात रविवारी (ता.२५) प्राप्त झालेल्या एक हजार ५४० अहवालांपैकी पाच अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार १४२ एवढी झाली आहे. यातील ८७ हजार ४४७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ४० रुग्ण उपचार घेत असून यात सहा बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका (Nanded Municipal Corporation) क्षेत्रात -दोन, नांदेड ग्रामीण -दोन, मुदखेड -एक, देगलूर (Deglur)- एक असे एकूण पाच बाधित आढळले. आज जिल्ह्यातील आठ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड -एक, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील - सात असे आठ व्यक्तीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आज ४० कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी- पाच, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल - तीन, देगलूर - तीन, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण - २५, नांदेड (Nanded) जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण - चार व्यक्ती उपचार घेत आहेत. (nanded covid cases declines, five tested positive glp88)

हेही वाचा: अल्पवयीन मुलांना पॉर्नचे आकर्षण, नोटिफिकेशन्सने लक्ष विचलित

नांदेड कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह - ९० हजार १४२

एकूण कोरोनामुक्त - ८७ हजार ४४७

एकूण मृत्यू संख्या - दोन हजार ६५५

रविवारी बाधीत - ५

रविवारी सुट्टी दिलेले - ८

रविवारी मृत्यू - शून्य

उपचार सुरु - ४०

अतिगंभीर प्रकृती असलेले - ६

loading image
go to top