

Nanded Crime
esakal
नांदेड : शहर व जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत चोरीची दुचाकी व सात मोबाइल असा एक लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत विनापरवाना धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीस अटक करून दोन तलवारी व एक खंजर जप्त करण्यात आला.