esakal | Nanded: पीकपेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

पीकपेरा

पीकपेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात अव्वल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ई-पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी खरिपातील पीकपेरा ऑनलाइन नोंदवला आहे. त्यात मराठवाड्यात नांदेड अव्वल ठरले आहे. लातूर दुसऱ्या, उस्मानाबाद तिसऱ्या स्थानी आहे. पेरा नोंदणीची मुदत गुरुवारी (ता. १४) संपत असून उर्वरित शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

राज्य सरकारने यंदा ई - पीक पाहणी अ‌ॅप सुरू करून पीकपेरा नोंदणीचा कार्यक्रम शेतकरी स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येत आहे. १५ ऑगस्टला या उपक्रमाला सुरवात झाली. मध्यंतरी अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नोंदणीच्या कामाला गती आली नाही. त्यामुळे प्रारंभी ३० सप्टेंबरपर्यंत तर त्यानंतर १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १९ लाख ६२ हजार ६४ नोंदी झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत तीन लाख ५२ हजार ६९१ नोंदी झाल्या आहेत. त्या मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीला प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ. विपीन यांनी समाधान व्यक्त करून उर्वरित शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी केल्यास विविध कामांसाठी लाभदायी ठरेल, असे आवाहन केले आहे.

मराठवाड्यातील पीकपेरा नोंदी

नांदेड ः तीन लाख

५२ हजार ६९१

लातूर ः तीन लाख

तीन हजार ७०

उस्मानाबाद ः दोन लाख ५६ हजार ३८

जालना ः दोन लाख

४० हजार ६१२

बीड ः दोन लाख

३५ हजार ८२

औरंगाबाद ः दोन लाख १६ हजार ७७८

हिंगोली ः एक लाख ८७ हजार १६३

परभणी ः एक लाख ४० हजार ६३०

एकूण ः १९ लाख

६२ हजार ६४

loading image
go to top