

Nanded News
esakal
नांदेड: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शनिवार (ता. चार) रस्त्यालगतच्या असलेल्या विहिरीत वाहन कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कठडे नसलेल्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबतही चिंता व्यक्त केली जात असून धोकादायक विहिरींना कठडे बसविण्याची मागणी होत आहे.