नांदेड : देगलूर दौऱ्यावर आलेले चंद्रकांतदादा भजनात दंग!

कोणी शेतकऱ्यांसोबत बांधावर भोजन करतात तर कोणी बैलगाडी, ट्रॅक्टर चालवीत शिवार गाठतात. त्‍यांचे हे वेगळेपणही लक्षवेधी ठरते.
चंद्रकांतदादा पाटील
चंद्रकांतदादा पाटीलsakal
Updated on

देगलूर (जि. नांदेड) : दौरे, बैठकी, प्रचार आदींत व्यस्त असलेले राजकीय नेते कधी कधी आपली हे नित्याची वाट बदलून वेगळे काहीतरी करतात. कोणी शेतकऱ्यांसोबत बांधावर भोजन करतात तर कोणी बैलगाडी, ट्रॅक्टर चालवीत शिवार गाठतात. त्‍यांचे हे वेगळेपणही लक्षवेधी ठरते. देगलूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काहीकाळ भजनात दंग झाले होते.

दौऱ्यातील व्यस्त कार्यक्रमांतून पाटील यांनी वेळ काढून भजन, कीर्तन व प्रवचनाचा तीनशे वर्षाचा समृद्ध वारसा लाभलेल्या येथील धुंडा महाराज देगलूरकर संस्थानला गेल्या सोमवारी (ता. १८) भेट दिली. तेथे सुरू असलेल्या भजनात सहभाग घेतला. अंबरीष महाराज देगलूरकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांच्या भजनात टाळ हाती घेऊन पाटील काहीकाळ भजनात दंग झाले.

धावपळीच्या दिनचर्येनंतर त्यांची सत्संगावरील भक्ती पाहून अनेकांना कुतूहल वाटले. एरवी सातत्याने विरोधकांवर शब्दरूपी बाण सोडणाऱ्या चंद्रकांतदादांमध्ये वारकरी दडल्याची प्रचिती देगलूरकरांना यानिमित्ताने आली. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, गंगाधरराव जोशी, श्याम भारती महाराज, ऋषिकेश महाराज, शंतनू महाराज देगलूरकर, सुबोध महाराज आदी उपस्थिती होते. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे राज्य समन्वयक राजेश महाराज देगलूरकर यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक केले. संत परंपरेतील या संस्थानाच्या समृद्ध वारसा पुढील पिढीने कसा जोपासला, हे त्यांनी सांगितले. संस्थानतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

देशसेवा करण्याची विविध माध्यमे असतात. सामाजिक समानतेचे अधिष्ठान असेल तर ती सेवा समाजाच्या उत्थानासाठी सत्कारणी लागते. संतांच्या सहवासातून मानवाला सुखाची प्राप्ती होते. देगलूरकर घराण्याचे संत परंपरेतील योगदान फार मोठे आहे.

- चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded
Turning Grief into Determination: Abhimanyu Cracks MPSC Revenue Assistant Exam
Police Raid Grocery Store, Trace Larger Gutkha Stock Worth Lakhs in Nanded City
Mother’s hard work and son's determination lead to PSI success
Marathi News Esakal
www.esakal.com