esakal | नांदेड : घोडा पार्किंगची ‘त्या’अधिकाऱ्याची मागणी;  नेटकऱ्यांमधून तोंडसुख 

बोलून बातमी शोधा

file photo}

अशा परिस्थितीत एका शासकीय अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत घोडा बांधण्याची परवानगी चक्क जिल्हाधिकाऱ्यांना मागितली.

नांदेड : घोडा पार्किंगची ‘त्या’अधिकाऱ्याची मागणी;  नेटकऱ्यांमधून तोंडसुख 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड ः सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. बव्हंशी राज्यांमध्ये तर पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केलेली आहे. अशा परिस्थितीत एका शासकीय अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत घोडा बांधण्याची परवानगी चक्क जिल्हाधिकाऱ्यांना मागितली. पण ती पेट्रोलच्या वाढलेल्या दरांमुळे नव्हे तर पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे. 

अशी अजबगजब मागणी करणारे हे अधिकारी आहेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख. जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांना दिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे दुचाकी वाहनाने कार्यालयात येण्यास मला त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करायचे ठरवले आहे. घोड्यावर बसून विहित वेळेत येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, ही विनंती.’अशा आशयाचे पत्र मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. 

पेट्रोलचे दर प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे श्री. देशमुख यांनी ही मागणी केली असावी, असा समज सुरुवातीला संबंधितांचा झाला होता. पण पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी ही मागणी केल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर यांनी त्या अधिकाऱ्याला तंबी दिल्याची माहिती आहे. या दरम्यान हे पत्र सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाले. पेट्रोलच्या दरवाढीमुळेच ही मागणी केली असल्याचा समज नेटकऱ्यांचाही झाला होता. पण पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्याचा उल्लेख पत्रात वाचल्यावर लोकही बुचकळ्यात पडले. मग प्रश्‍न असा उपस्थित झाला की, कदाचित नांदेड शहरातील रस्ते खराब असतील आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्याला दुचाकीवरुन येण्यास त्रास होत असावा. पण तशीही स्थिती नाही. 

नांदेड ग्रामीणमधील रस्ते खराब आहेत. पण शहरातील आणि त्यातल्या त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते चांगले आहेत. त्यामुळे काहीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने त्या अधिकाऱ्याने अशी मागणी केली असावी, असे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोलले जात आहे. 

संबंधीत अधिकाऱ्याचे पत्र मला मिळाल्यानंतर त्यावर निर्णय घेऊ. सध्या तरी हा विषय तेवढा महत्वाचा नसल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी सांगितले. 

नेटकऱ्यांमधून तोंडसुख

पत्र प्राप्त झाले, या विषयी खालील बाबींची पूर्तता करण्यात यावी म्हणजे आपल्या विनंतीचा विचार करण्यात येईल : 

१)घोडा खरेदी करण्यासाठी विभागाची घेतलेली परवानगी

२)घोडा हाच प्राणी खरेदी करण्याचे प्रयोजन काय याचे सविस्तर वृत्त?

३) घोड्याची रंग, उंची, लांबी किती असेल याबाबतची यथोचित माहिती?

४) वन्यजीव विभागाची परवानगी सोबत जोडावी

५) घोड्याने केलेली घाण काढण्यासाठी आपण काय नियोजन केले आहे याबाबतचा अहवाल?

६) घोडा बांधण्यासाठी आपण निवडलेली जागेचा नकाशा, उतारा व या जागी घोडा बांधल्यास कोणतीही अडचण होणार नाही या बाबतचे "ना हरकत प्रमाणपत्र" सोबत जोडावे.

७)संबंधित विभागाच्या हद्दीत जागा येते याची घेतलेली परवानगी सोबत जोडावी.

८) घोडा हाताळण्यासाठी आपण प्रशिक्षण घेतले आहे का? घेतले असल्यास दाखला सोबत जोडावा

९) घोडा उधळल्यास जबाबदारी कोणाची राहील हे आपल्या अर्जात नमूद केलेले नाही, त्या बाबतचे प्रातिज्ञापत्र जोडावे

१०) घोड्याच्या चाऱ्याची आपण काय व्यवस्था केलेली आहे या संबंधीचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल?

११) आपण पुरवण्यात येणारा चाऱ्याची अन्न व औषध विभागामार्फत दररोज तपासणी करून घेतल्या जाईल या बाबतचे प्रतिज्ञापत्र बंधनकारक राहील.

१२) घोड्यास बांधण्यासाठी शेड बांधण्यासाठी येणारा अंदाजे खर्च, तसेच त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणारे प्रतिज्ञापत्र.

१३) वन्य जीव हाताळणी कायदा अंतर्गत शेड मधील तापमान नियमित ठेवण्यासाठी आवश्यक वतानुकूलक यंत्रणा व त्या संदर्भाचा विद्युत अभियांत्रिकी विभागाचा अहवाल

१४) याव्यतिरिक्त वेळोवेळी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे आपणास पालन करणे बंधनकारक राहील या विषयीचे प्रतिज्ञापत्र

१५) वाहतूक व यातायात विभागाचे "ना हरकत प्रमाणपत्र" 

१६) वरील सर्व अटींची पूर्तता कराव्यात त्याच बरोबर आपल्या मणक्याच्या आजारामुळे आपण आपले कार्य करण्यास समर्थ आहात यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या द्वारे प्रमाणित "Fitness Certificate" दाखल करावा. 

वरील सर्व कार्यवाही 3 दिवसात पूर्ण करून त्याचा अहवाल कार्यालयात दाखल करावा.

या वर वरिष्ठ अधिकारी यांनी विचारललेे प्रश्न

घोडा बांधण्यासाठी खालील अटी व शर्ती पूर्तता करावी

1.घोड्याचे मलमुत्र साफ करण्याची काय व्यवस्था केली आहे ?

2. घोडं बांधण्यासाठी किती चौरस फूट जागा आवश्यक आहे ?

3.घोड्याला कोणत्या लस देण्यात आल्या आहेत?

4. घोडा अनावश्यक ओरडू नये म्हणून काय व्यवस्था केली आहे?

5.आपल्याला घोडा  घेणेबाबत कोणत्या वैद्यकीय व्यावसायिकाने शिफारस केली आहे ?प्रत जोडावी.

6. मनासे वर्तणूक नियमांचे पालन करून खरेदीस सक्षम अधिकारी त्यांची परवानगी घेतली आहे का?

7. घोडा घेण्यासाठी निधी कोणत्या मार्गाने उपलब्ध केला आहे ?

8.घोडं चालविण्याचे प्रशिक्षण कोणत्या घोडशाळेत घेतले आहे ? संस्था शासनमान्य असल्या बाबत प्रत जोडावी

Cruelty Against Animal Prevention Act अंतर्गत घोड्याला त्रास होणार नाही याबाबत हमीपत्र द्याव...