नांदेड : वाळू माफियाकडून नायब तहसिलदारावर हल्ला, मुगाजी काकडे जखमी

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 7 October 2020

वरिष्ठांच्या सुचनेवुन कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसुलच्या एका पथकावर मंगळवारी (ता. सहा) दुपारी तीनच्या सुमारास हल्ला करुन पथकप्रमुख नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांना जखमी केले

नांदेड : शहर व परिसरातून अवैधरित्या वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्या जात आहे. अशा अनेक तक्रारी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे प्राप्त झाल्या. यानंतर महसुल विभागाला सतर्क करुन अवैध वाळू संदर्भात कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. वरिष्ठांच्या सुचनेवुन कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसुलच्या एका पथकावर मंगळवारी (ता. सहा) दुपारी तीनच्या सुमारास हल्ला करुन पथकप्रमुख नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांना जखमी केले. विशेष हे म्हणजे हे पथक वाजेगाव परिसरात पोलिस बंदोबस्ताशिवाय गेले होते. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात एका अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.  

वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील नायब तहसिलदारास वाळूमाफियांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. शहरानजीक वाहणाऱ्या गोदावरी नदीतील वेगवेगळ्या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर मंगळवारी चार पथके जुना पुल भागातील वेगवेगळ्या वाळू घाटावर पोहोचले. चार पथकांकडून वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे तराफे जप्त करुन जाळून नष्ट केले.

हेही वाचाजिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न निकाली काढणार- सीईओ वर्षा ठाकूर -

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात अनोळखी माफियाविरुद्ध गुन्हा 

या कारवाईदरम्यान नांदेड तहसिलचे नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या पथकावर हल्ला केला. एवढेच नाही तर एका वाळू माफियाने श्री. काकडे यांना मारहाण केली. त्यांना धक्का मारुन खाली पाडले. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर वाळू माफियाने नदीत उडी घेऊन पोबारा केला. पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनाही शिविगाळ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत देशपांडे यांना समजली. त्यानी तात्काळ घटनास्थळी येऊन जखमी काकडे यांना शासकिय रुग्णालयात दाखल केले. नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात अनोळखी माफियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

यापूर्वीही झाला होता हल्ला 

वाळू माफियांनी जुलैमध्येही गोवर्धन घाट परिसरातील हस्सापूर शिवारात नांदेड तहसिलदाच्या पथकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तहसिलदारांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. काही दिवसातच वाळू माफियाकडून पुन्हा हा दुसरा हल्ल्याचा प्रकार घडला आहे. घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी पाहणी केली. गोदावरी नदीतून विविध ठिकाणी वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. 

येथे क्लिक करावय कोवळे पण गुन्हेगारी करणे भोवले -

पोलिस बंदोबस्ताशिवाय मुगाजी काकडे कसे गेले ?

तत्कालीन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वाळू माफियाविरुद्ध कारवाई करायची असेल तर पोलिस सोबत घेणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्ह्याचे समन्वयक अधिकारी तथा जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांची नेमणुक केली होती. त्यांच्याकडून वाळू माफियांवर कारवाई करणाऱ्या पथकासोबत पोलिस देण्यात येत होते. मात्र मुगाजी काकडे यांनी पोलिस विभागाला सुचना न देता घाटावर गेले. याचा फायदा माफियांनी घेतल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे महुसलच्या अधिकाऱ्यांना अवैध मार्गाने वाळू उपसा कोण करते हे सर्व माहित असतांना त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Deputy Tehsildar attacked by sand mafia, Mugaji Kakade injured nanded news