esakal | नांदेड : देविदास पवारचे मारेकरी अद्याप फरारच; जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराचे कृत्य
sakal

बोलून बातमी शोधा

बारड क्राईम न्यूज

नांदेड : देविदास पवारचे मारेकरी अद्याप फरारच; जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराचे कृत्य

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : पैशाच्या देवाणघेवाणीवरुन निवघा (ता. मुदखेड) येथील एकाला (Mudkhed police firing pistol) भरवस्तीत पिस्तुलातून गोळी झाडून गंभीर जखमी करुन त्याचे अपहरण केले. मुदखेड परिसरात एका शेतावर नेऊन पुन्हा दोन गोळ्या झाडून आणि तलवारीने सपासप वार करुन सोमवारी (ता. १७) खून केला होता. निवघा गावातून देविदास पवार (Devidas pavar marders) याला पळवून नेताना त्याने विरोध करणाऱ्यांच्या दिशेने हवेत गोळीबार करुन ज्याला मरायचे आहे त्यांनी पुढे असा दम दिला होता. यामुळे देविदासच्या मदतीला कोणीच पुढे आले नाही. निर्घृण खून करणारे लक्की मोरेसह तिन्ही मारेकरी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडले नसल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Nanded: Devidas Pawar's killer still absconding; The act of a criminal released on bail)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुदखेड तालुक्यात दहशत माजविणारा व सराईत गुन्हेगार लक्की मोरे हा नुकताच एका गंभीर गुन्ह्यात अडकलेला कारागृहातून नुकताच जामिनावर सुटला होता. त्याने निवघा तालुका मुदखेड येथील देविदास माधव पवार (वय ३५) याच्याकडून पार्टी मागण्याचा बहाणा केला. पैसे देणे- घेण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाला होता. देविदास पवार हा मारेकरी लकी मोरे याला सापडत नव्हता. अखेर सोमवारी (ता. १७) हा सकाळी अकराच्या सुमारास निवघा येथील बाबाराव शिंदे यांच्या दुकानासमोर थांबला असल्याची माहिती मिळाली. यावेळी मोरे हा आपल्या दोन साथिदारासह एका विना नंबरच्या दुचाकीवरुन देविदास पवारला गाठले. त्याच्याशी वाद घातला, एवढेच नाही तर त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करु लागला. दुचाकीवर बसण्यास नकार देताच लक्की मोरे आणि आपल्या जवळील पिस्तूलमधून त्याचा मांडीमध्ये (जांघेत) गोळी मारुन त्याला गंभीर जखमी केले.

हेही वाचा - चांगली बातमी : सुशिक्षित शेतकऱ्याने फळबागेच्या माध्यमातून साधला आर्थिक विकास

जखमी अवस्थेत त्याला उचलून दुचाकीवर बसवून मुखत्यारवाडी (ता. मुदखेड) शिवारात बाळासाहेब देशमुख इंगोले यांच्या शेतातील धुर्‍यावर नेले. तिथे त्याच्यावर पुन्हा दोन पिस्तूलच्या गोळ्या झाडल्या आणि तलवारीने सपासप वार करुन त्याचा निर्घृण खून करुन पसार झाले. गावातून जखमी अवस्थेत घेऊन जाताना अनेकांनी पाहिल्यानंतर त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र लक्की मोरे याने हवेत गोळीबार करुन ज्याला मरायचे आहे त्यांनी पुढे या अशी धमकी दिली. मात्र लक्की मोरेच्या हातात पिस्तूल आणि त्याच्या इतर दोन साथीदारांच्या हातात तलवारी असल्याने त्यांना पकडण्याची कोणी हिंमत केली नाही.

घटनेची माहिती मुदखेड आणि बारड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह आदी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पंचनामा करुन शववच्छेदनासाठी देविदासपवार याचा मृतदेह विष्णुपूरीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस पथक रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. लक्की मोरे हा नुकताच एका गंभीर गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता. तो या परिसरात सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. याप्रकरणी कामाजी माधव पवार यांच्या फिर्यादीवरुन बारड पोलिस ठाण्यात संगनमताने अपहरण करुन खून व भारतीय हत्यार कायदा कलमान्वये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. तुगावे करत आहेत.