

धर्माबाद : १९९९ ला पहिली सहकार विद्यामंदिर स्थापन करण्यात आले असून त्यावेळी केवळ ९० विद्यार्थी होते. आज राज्यातील २२ विद्यामंदिरात २९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षेविना शिक्षण देऊन आम्ही गुणवत्ता व संस्कारमय विद्यार्थी घडविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन बुलढाणा आर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी केले.
शहरातील राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर मूर्ती स्थापना महोत्सव नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बुलढाणा आर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, सिएमडी सुकेश झंवर, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निर्मलचे जिल्हाधिकारी मुशर्रफ फारुखि, आमदार राजेश पवार, माजी आमदार वसंतराव चव्हाण, राजेश देशमुख कुंटुरकर, कैलाश देशमुख गोरठेकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, धर्माबादचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार दतात्रय शिंदे यांच्यासह गुरुवर्य, महंत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. गणपती, विद्येची देवी माता सरस्वती, स्व.राजारामजी काकाणी यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. धर्माबाद सारख्या तालुक्याच्या ठिकाणी उद्योजक सूबोध काकाणी यांनी सर्वसुविधायुक्त भव्य शैक्षणिक संकुल उभारणी केली. तसेच जागतिक पातळीवर मोठा लौकिक असलेल्या एलन सारख्या नामांकित संस्थेची शाखा सुरुवात केली. ही बाब कौतुकास्पद आहे. स्व.राजाराम काकाणी यांच्याकडून मिळालेले जनसेवेचे वृत्त व परंपरा त्यांनी चालू ठेऊन खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली.
कोरोनाच्या वैश्विक संकटात सेवाभावी वृत्तीने त्यांनी केलेल्या कार्याचा राज्यभर लौकिक निर्माण झाला असून धर्माबादची एकता व आदर्शता त्यातून स्पष्टपणे दिसून आली. असे गौरवोद्गार यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. सर्वांच्या सहकार्यातुन सुरू असलेले सामाजिक सेवेचे व्रत यापुढे जोपासना करण्याचे अभिवचन या वेळी राजकुमारी काकाणी व उद्योजक सूबोध काकाणी यांनी बोलून दाखविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.