esakal | नांदेड : सामाजिक बांधिलकी जपत कोवीड रुग्णांना बिस्कीटचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

डॉक्टर, रुग्णातून सर्व स्तरातून अजय बाहेती यांचे कौतुक.

नांदेड : सामाजिक बांधिलकी जपत कोवीड रुग्णांना बिस्कीटचे वाटप

sakal_logo
By
चंद्रकांत सुर्यतळ

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : बरबडा परिसरात असलेल्या व कृष्णूर येथे व नायगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्याकडून नायागांवच्या कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी कंपनीच्या वतीने मोफत बिस्कीट मंगळवारी (ता. सहा) वाटप करण्यात आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्त पालक, बालक व रुग्ण व डॉक्टर यांनी या निर्णयाचे स्वागत व व्यक्त केले आहे.

नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्याकडे तालुक्यातील बाळासाहेब पांडे हे हळद विक्रीच्या सौद्याच्या निमित्ताने गेले असता बाहेती यांच्याकडे कोव्हिड सेंटरसाठी आपण काही तरी करावे असा विचारणा केली. बाहेती यांनी लगेच होकार दिल्यानंतर कोव्हिड सेंटर प्रमुख डाॅ. देवणीकर यांचे बोलणे करुन दिले. 

हेही वाचा - सकारात्मक मानसिकतेसह रोग प्रतिकारशक्ती वाढवल्यास कोरोनाला हरवणे शक्य - डॉ. संदीप देशपांडे

या नुसार कोरोनाग्रस्त रुग्णाची तब्येत टवटवीत झाली पाहिजे. या हेतूने एकूण १५० बिस्कीटचे बॉक्स वाटप करण्यात आले. रुग्णालयातील उपचार घेत असलेले रुग्णासह जनतेतून अजय बाहेती यांचे पाच दिवस पुरतील असे बिस्कीट डब्याचे वाटप केल्यामुळे कोरोना रुग्ण यांनी अतिशय समाधान व्यक्त केले असून नाष्टा, जेवण मागे पुढे झाले तर यांचे बिस्कीट ऊर्जा देत असल्याचे आमच्या डॉक्टर व रुग्णारुग्णातून समाधान व्यक्त करुन बाहेती यांचे कोतुक केले आहे.
   
कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत गुंटूरकर, डॉ. नरेश देवनीकर, डॉ. अविनाश पांढरे कौठाळकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून डाॅ. पांढरे, डॉ. वाघमारे, डाॅ. बिडवई, डॉ. ताटे, डॉ. गजले, डॉ. त्रिपती बिराजदार, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. अंजेली खंडगावकर, डॉ. वर्षा नारे, डाॅ. गजानन बोधने, डॉ. शिल्ला पेंटे, डॉ. नर्स रेखा खेटाळे, करुणा मोदलवाड, महानंदा कोंके, करुणा आडपलवाड, पूजा सूर्यकार आदीची यावेळी उपस्थित होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image