Nanded
Nandedsakal

Nanded : हाक द्या... मदतीला धावून येईल! आ.माधवराव पाटील

८५० दिव्यांग बांधवांना उपकरणाचे वाटप

हदगाव : दिव्यांग बांधवांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेमुळे त्यांना त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्यात अनेक अडचणी येतात. रोजच्या जगण्यात त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. एखादी गोष्ट करण्यासाठी सामान्य व्यक्ती पेक्षा दिव्यांग व्यक्तीला अधिक परिश्रम घ्यावे लागतात. अधिकची ऊर्जा खर्च करावी लागते. परिणामी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कोणतीही अडचण आल्यास कोणत्याही क्षणी हाक द्या मी मदतीला धावून येणार असल्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिव्यांग बांधवांच्या उपकरणाच्या वाटपाच्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले.

या वेळी तहसीलदार जीवराज डापकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.जी.ढगे, तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील बाभळीकर, किशोर पाटील, सुनील सोनुले, माजी नगराध्यक्ष अमित आरसूळ, माजी नगरसेवक बालाजी राठोड, शहराध्यक्ष खदीरखान, माजी नगरसेवक फिरोज पठाण, निवघा येथील उपसरपंच श्याम पाटील, शिवप्रसाद अण्णा, मारोतराव शिंदे, आत्माराम पाटील जाधव वाटेगावकर, संदीप शिंदे, संतोष माने, अनिल पवार करमोडीकर, विलास चव्हाण उंचाडकरसह आदींची उपस्थिती होती.

या शिबिरात दिव्यांगांसाठी व्हील चेअर, ट्राय सायकल, ट्राय मोटरसायकल, चष्मे, काट्या, श्रवण यंत्रे, कुबड्या, ब्रेल किट, जयपुर फुट, आदी मोफत साधने वाटप करण्यात आली आहेत. या वेळी जवळगावकर बोलताना म्हणाले की, दिव्यांग बांधवांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन त्यांच्यासाठी अनेक समस्या निर्माण करतात. दिव्यांग बांधवांशी कसे वागावे याविषयी समाजात असलेला जागृतीचा अभाव याला कारणीभूत आहे. वेळप्रसंगी त्यांना मदतही करण्याची गरज पडल्यास मागेपुढे पाहू नये अशा ही सूचना आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सर्वसामान्यांपर्यंत योजना पोचविणे महत्त्वाचे

केंद्र शासन असो या महाराष्ट्र शासन सर्वसामान्यांसाठी ज्या योजना राबवत असते. त्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे काम लोकप्रतिनिधीचे असते, परंतु तेच अकार्यक्षम असल्यास त्याचा फटका सर्वसामान्यला बसतो. परंतु आमदार जवळगावकर हे केंद्र शासन असो या महाराष्ट्र शासन यांनी अमलात आणलेल्या प्रत्येक योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावशालीपणे राबवत असताना दिसून येतात. आमदार जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात घरकुल योजना राबविण्यात आली. शहरात तब्बल तेराशे घरकुल मंजूर झाली. त्यामुळे शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार जळगावकर यांची धडपड बघावयास मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com