नांदेड : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे महसूल विभागाचे पितळ उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

illegal sand transporting

नांदेड : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे महसूल विभागाचे पितळ उघड

बिलोली : क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करणाऱ्या आठ ते दहा वाहनावर देगलूरच्या नव्याने रुजू झालेल्या सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी साडेचार लाखांची दंडात्मक कारवाई केली. बिलोली तालुक्यातून दररोज अनेक वाळूच्या गाड्या खुलेआम वाळूची तस्करी करत आहेत, हे या कारवाईतून उघड झाले असून बिलोलीचे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार तसेच महसूल विभागातील अधिकारी हे वाळू तस्करीला पूर्णतः पाठबळ देत असल्याचे चर्चिल्या जात आहे.

मांजरा नदीपात्रातील आठ ते नऊ घाटातून प्रारंभी पासूनच वाळूची खुलेआम तस्करी सुरू आहे. विना रॉयल्टी क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करणारे अनेक ट्रक महसूल विभाग, पोलिस व आरटीओ विभागाच्या डोळ्यादेखत वाळूची लूट करीत आहेत. महसूल विभागातील बिलोली तालुक्यातील जवळपास सर्वच अधिकारी वाळू ठेकेदारांशी अर्थपूर्ण तडजोडी करून तस्करीसाठी मार्ग मोकळा करून देत आहेत. हे देगलूरच्या सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे.

बिलोली तालुक्यातील बोळेगाव वाळू घाटातील आठ हायवा गाड्या व बारा टायरच्या गाड्यांना चार लाख ६६ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. वास्तविक नदीपात्रातून बाहेर पडणाऱ्या वाळूच्या गाडीचे वे बिल व इनव्हाईज तपासणी केल्याशिवाय गाडी पुढे सोडता येत नाही, मात्र प्रशासनाने निवडलेले पथक नदीघाटावर फिरकत नसल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांचे बैठे पथक केवळ नावालाच स्थापन करून जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मांजरा बचाव कृती समितीने केला आहे.

Web Title: Nanded District Collector Action Revenue Department Illegal Sand Transporting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top