नांदेड जिल्हा २० हजार पार, रविवारी ८५ जण पॉझिटिव्ह, २५ रुग्ण कोरोनामुक्त 

शिवचरण वावळे
Sunday, 22 November 2020

रविवारी तीन हजार ६०३ जणांचे अवहाव प्राप्त झाले. यामधे तीन हजार ४६७ निगेटिव्ह, ८५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० हजार पार गेली आहे. 

नांदेड - कोरोनाबाधित रुग्णाचे रोज नवीन आकडे समोर येत आहेत. रविवारी (ता. २२) एका कोरोना बाधिक रुग्णांचा मृत्यू, २५ रुग्ण कोरोनामुक्त, तर नव्याने ८५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. नांदेड जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या २० हजार पार गेल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

शनिवारी (ता. २१) तपासणी करिता घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी तीन हजार ६०३ जणांचे अवहाव प्राप्त झाले. यामधे तीन हजार ४६७ निगेटिव्ह, ८५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० हजार पार गेली आहे. 

हेही वाचा- नांदेड : अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी स्विकारतांना एकाला रंगेहात पकडले

 आतापर्यंत ५४४ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू 

रविवारी दिवसभरपात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - सात, श्रीगुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - दहा, महापालिकेंतर्गत एनआरआय भवन - एक, हदगाव - एक, अर्धापूर - दोन व लातूर येथे संदर्भित करण्यात आलेले - चार असे २५ रुग्ण औषधोपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १८ हजार ८९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दुसरीकडे कंधार तालुक्यातील तिरकसवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या ७६ वर्षीय कोरोना बाधिक पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५४४ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड जिल्ह्यातील शाळांची घंटा राहणार बंदच, एक डिसेंबरनंतर निर्णय

१८ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त 

नांदेड वाघाळा महापालीकेंतर्गत - ४७, नांदेड ग्रामीण - सात, भोकर - दोन, किनवट - दोन, बिलोली - सात, धर्माबाद - एक, कंधार - तीन, मुखेड - दोन, नायगाव - एक, देगलूर - चार, हदगाव - एक, माहूर - दोन, लातूर - एक, हिंगोली - दोन, यवतमाळ - दोन आणि परभणी - एक असे ८५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २० हजार सहा इतकी झाली आहे. त्यापैकी १८ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३७४ बाधितावर औषधोपचार सुरु आहेत. त्यातील १७ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ९७२ स्वॅबची तपासणी सुरू होती. विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात - १७०, जिल्हा शासकीय रुग्णालयात - ७८ खाटा रिकाम्या आहेत. 

कोरोना मीटर ः 

रविवारी पॉझिटिव्ह - ८५ 
रविवारी कोरोनामुक्त - २५ 
रविवारी मृत्यू - एक 
एकूण पॉझिटिव्ह - २० हजार सहा 
एकूण कोरोनामुक्त - १८ हजार ८९४ 
एकूण मृत्यू - ५४४ 
उपचार सुरु - ३७४ 
गंभीर - १७ 
स्वॅब अहवाल बाकी - ९७२ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded district crossed 20,000 On Sunday, 85 positive and 25 patients were released from the corona Nanded News