
नांदेड : यंदा जिल्ह्यात दोन जुलैपर्यंत एकूण १६४.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १५७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा ७.९ मिमीने अधिक पर्जन्यमान झाल्याचे प्रशासनाकडील आकडे सांगत आहेत. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.