esakal | नांदेड जिल्ह्यात बुधवारी 14 पाॅझिटिव्ह, 30 रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

बुधवारी (ता.नऊ) प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सर्वात कमी म्हणजे १४ रुग्ण बाधित आढळले आहे. तसेच ३० रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी दिली आहे. बुधवारी एकही रुग्ण दगावला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

नांदेड जिल्ह्यात बुधवारी 14 पाॅझिटिव्ह, 30 रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमीजास्त होत असून, बुधवारी (ता.नऊ) प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सर्वात कमी म्हणजे १४ रुग्ण बाधित आढळले आहे. तसेच ३० रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी दिली आहे. बुधवारी एकही रुग्ण दगावला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

बुधवारी (ता. नऊ) प्राप्त झालेल्या ९५४ अहवालांपैकी ९३६ निगेटिव्ह, १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २० हजार ६८९ एवढी झाली आहे. यातील १९ हजार ६०६ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. रुग्णालयात औषधोपचार सुरु असलेल्या बाधितांपैकी १३ रुग्णांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवारी एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने मृतांची संख्या ५५४ वर स्थिर आहे.   

हेही वाचा - नांदेड : राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम जलद गतीने पूर्ण करा : खा. प्रताप पाटील चिखलीकर

बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी - एक,  जिल्हा रुग्णालय - सात, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण - सात, किनवट कोविड रुग्णालय - एक, खासगी रुग्णालय - पाच, मुखेड - एक, देगलूर - दोन, माहूर - एक आणि कंधार - पाच असे एकूण ३० बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. 

हे देखील वाचाच - नांदेड : शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी 50 कोटींचा निधी- पालकमंत्री अशोक चव्हाण

बुधवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात पाच, कंधार - एक, नांदेड ग्रामीण - एक, आंध्रप्रदेश - एक, मुखेड - दोन, देगलूर - एक, अर्धापूर - एक, माहूर - एक आणि बीड - एक असे एकूण १४ बाधित आढळले. जिल्ह्यात ३३४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १९, जिल्हा रुग्णालय २६, जिल्हा रुग्णालय नवी इमारत ३५, मुखेड २३, भोकर - दोन,  किनवट एक, हदगाव तीन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५८, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १४३, खासगी रुग्णालयात २४ असे एकूण ३३४ बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. 
 
कोरोना मीटर  

  • बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण - १४ 
  • बुधवारी कोरोनामुक्त - ३० 
  • बुधवारी मृत्यू- शून्य 
  • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २० हजार ६८९ 
  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १९ हजार ६०६ 
  • एकूण मृत्यू संख्या- ५५४ 
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ५२०
  • अतिगंभीर रुग्ण - १३
loading image