esakal | नांदेड : दिव्यांग पतीचा प्रियकराकडून खून; अटक दोघांना पोलिस कोठडी

बोलून बातमी शोधा

file photo}

अटक दोन्ही आरोपींना नांदेड ग्रामिण पोलिसांनी न्यायालयासमोर मंगळवारी (ता. २३) हजर केले असता न्यायालयाने त्यांना ता. २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

nanded
नांदेड : दिव्यांग पतीचा प्रियकराकडून खून; अटक दोघांना पोलिस कोठडी
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : एका दिव्यांग व्यक्तीचा खून करणाऱ्या तिघांना इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच काही तासाच्या आत इतवारा पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी हे विधीसंघर्षग्रस्त असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक दोन्ही आरोपींना नांदेड ग्रामिण पोलिसांनी न्यायालयासमोर मंगळवारी (ता. २३) हजर केले असता न्यायालयाने त्यांना ता. २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला होता. या संदर्भाने इतवारा पोलिस ठाण्यात मिसिंग ता. 17 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्या मयत व्यक्तीचे नाव सय्यद मनसब सय्यद मुमताजअली ( वय 42) वर्ष राहणार गणीपुरा नांदेड असे होते. नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी सय्यद मनसबच्या घरी भेट देऊन विचारणा केली होती.

इतवारा उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या सहकारी पोलिसांना या कामासाठी जबाबदारी दिली. त्यात गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे न त्यांचे पथकातील पोलिसांनी नांदेड सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरु केला. मनसब हा दिव्यांग झाल्यानंतर त्याची पत्नी हैदराबाद येथे राहत होती. तिथे मुळचा गणीपुरा नांदेड येथील 25 वर्षीय युवकासोबत सूत जमविले.

सदरील युवक आणि मनसबची पत्नी यांना लग्न करायचे होते. पण अडचण होता मनसब. त्याचा काटा काढण्यासाठी सदरचा युवक ता. 11 फेब्रुवारी रोजी नांदेडला आला. नियोजन करुन त्यांनी आपल्या दोन साथीदारांसह ता. 14 फेब्रुवारी रोजी एका ऑटोमध्ये बसवून शहरातून काही भागात फिरवत दारु पाजली आणि बोंढार पुलाखाली रात्री दहा ते अकरा या वेळेत नेले. तिथे चाकूने भोसकून त्याचा खून केला आणि त्याचे प्रेत पुलाजवळ रस्त्याच्या कडेला फेकून निघून गेले.

या सर्व प्रकरणाची हाताळणी करणारे डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या निदर्शनास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी मोमद जाफर अब्दुल वाजीद (वय २५) आणि शेख अली शेख बाबू या मारेकऱ्यांना गजाआड केले. गुन्ह्यात वापरलेला अॅटोसुद्धा जप्त केला. या दोघांनाही फौजदार शेख असद यांनी मंगळवारी (ता. २३) न्यायालयासमोर हजर केले यावेळी न्यायालयाने ता. २७ फेब्रुवारी रोजी पोलिस कोठडीत पाठविले आहे.