नांदेड : ताकबिडात घरगुती गॅसचा स्फोट, तीन घरे जळुन खाक; दहा लाखांचे नुकसान

file photo
file photo

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : बरबडा जिल्हा परिषद गटातील ताकबिड (ता. नायगाव) येथे रविवारी (ता. २८) मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास अचानक घरगुती गॅसचा स्फोट होऊन तीन घरास लागलेल्या आगीत संसार उपयोगी व जीवनावश्यक सर्व साहित्य जळून खाक झाले. यात दहा लाखांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे येथील सरपंच शिवराज पाटील यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताकबीड तालुका नायगाव येथील मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणारे संभाजी मंडलापुरे यांच्या घरातील घरगुती गॅसचा स्फोट रविवारी सकाळी अकराच्या सुमारास होऊन आग लागली. यामुळे लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. यात संभाजी किशन मंडलापुरे, हानमंत ईरबा मंडलापुरे, राधाबाई किशन मंडलापुरे या तिन्ही भावांचे या आगीत कौलारु घरासह घरातील गहू, तांदूळ, ज्वारी, दाळीसह कपडे घरातील भांडे व कपाटातील सोन्या चांदीचे दागिने, हरभरा पांच क्विंटल, घरगुती साहित्य, लॅपटॉप, शासकीय कागदपत्रे, शालेय साहित्य असे अंदाजीत सुमारे दहा लाखांचे जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याने आज घडीला मंडलापुरे कुंटुबीयांचा संसार उघड्यावर आला आहे.

यावेळी ताकबीडचे सरपंच शिवराज पाटील यांनी तात्काळ नायगाव येथील नगर पंचायतच्या अग्निशामक दलाला माहिती दिल्यामुळे नगर पंचायतच्या अग्निशामक दलाने अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. गावातील ग्रामस्थांनी अपआपल्या घरातील पाणी अनुन आग विझविण्यासाठी परिश्रम घेतल्याने ही आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला अन्यथा गावातील इतर घरास ही आज पेठ घेऊन पूर्ण गाव अगित जळून खाक झाले असते.सदरील माहिती नायगाव येथील तहसील कार्यालयासह वरिष्ठांना कळवले असता मंडळ अधिकारी कळकेकर यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा रीतसर पंचनामा केला आहे.

संभाजी मंडलापुरे यांच्या घराची आग आटोक्यात येईपर्यंत बाजूलाच असलेल्या हणमंत मंडलापुरे व राधाबाई मंडलापुरे यांच्या घराने ही पेट घेतला. पाहता पाहता एकमेकांना लागून असलेल्या तिन्ही घरांनी पेट घेतला. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिन्ही घरे जळून खाक झाली होती. या आगीत कोणतीही जिवित हाणी झालेली नसल्याची माहिती सरपंच शिवराज पाटील ताकबीडकर यांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com