Nanded शेतकऱ्यांच्या मागे दुहेरी संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soybin

पावसाच्या सरीवर सरी सोयाबीनचे पावसामुळे तर कापसाचे वन्य प्राण्यांकडून नुकसान

Nanded : शेतकऱ्यांच्या मागे दुहेरी संकट

शिवणी : किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पुढे मोठे संकट निर्माण केले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून परिसरात कमी अधिक प्रमाणात रोजच पाऊस चालू आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे पूर्ण नुकसान होत आहे. हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाची काढणीच्या वेळेस पावसाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास जातो की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच वन्य प्राण्यापासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. या परिसरात एकीकडे पावसाने तर दुसरीकडे वन्यप्राण्यामुळे या परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सुरुवातीला कापूस पिकाची अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस पिकाची वाढ झाली नव्हती.

आता कापसाची वाढ व फुले व बोंडी लागण्याची वेळ आली तेव्हा शेतातील कापूस पिकाचे वन्य प्राण्याकडून कापसाचे बोंडे व झाडे खाऊन नष्ट करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना सोलरचा झटका लावण्याची वेळ येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना पंधरा ते वीस हजार रुपयाची जास्तीचा खर्च करावा लागत आहे. हातात आलेल्या कापूस पिकाचे वन्य प्राण्याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे.

शिवणी येथील शेतकरी संजय कटलवाड यांची शेती दया धानोरा शिवारात असून त्यांच्या शेतातील तीन एकरातील कापूस पिकाचे वन्य प्राण्याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी वन विभागाला पंचनामा करण्यासाठी विनंती अर्ज सादर केला आहे.