नांदेड : जिल्ह्यात असा आहे ड्राय डे, मद्यपीनो द्या इकडे लक्ष 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 28 November 2020

जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर रविवार 29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून मतदानाच्या अगोदरचा दिवस सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण दिवस तर मतदानाचा दिवस मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील.

नांदेड : औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणुकीदरम्यान नांदेड जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढीलप्रमाणे बंद राहतील, असे आदेश निर्गमीत केले आहे.

जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर रविवार 29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून मतदानाच्या अगोदरचा दिवस सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण दिवस तर मतदानाचा दिवस मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

हेही वाचा - प्रशासन नमले, आदिवासी जिंकले

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आवाहन 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर  झाला आहे. नांदेड जिल्‍ह्यातील एकूण 123 मतदान केंद्रांवर एक डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

नांदेड जिल्‍ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी त्यांच्या मतदान केंद्रावर एक डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: This is a dry day in the district, pay attention to alcohol nanded news