Nanded : अंगणवाडीतील चिमुकल्यांना ड्युएल डेस्क

जिल्हा वार्षिक योजना; किशोरवयीन मुलींना मोफत एमएस-सीआयटी प्रशिक्षण
Nanded
Nandedesakal

नांदेड : बालकांच्या शाळेचा ‘श्रीगणेशा’ करणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये चिमुकल्यांना बसण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ड्युएल डेस्क मंजूर झाले आहेत. त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्रामिण भागातील किशोरवयीन मुलींना मोफत एमएस - सीआयटीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Nanded
Women Health : 45 व्या वर्षानंतर महिलांमध्ये अचानक वाढतो हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या काय आहेत कारणं?

जिल्ह्यात तीन हजार ७२२ अंगणवाड्या आहेत. यावर सहा हजार सातशे अंगणवाडी सेविका, मदतनीस अल्पशा मानधनावर कार्यरत आहेत. मात्र, असे असले तरी अंगणवाड्यामार्फत चिमुकल्यांना पुर्व शिक्षण मिळावे तसेच गर्भवती मातांची काळजी यासह अन्य कामे सातत्याने करण्यात येत आहेत. मध्यंतरीच्या काळात अंगणवाडीतील चिमुकल्यांना बसण्यासाठी चटई किंवा सतरंजीचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन शासनाने चिमुकल्यांना बसण्यासाठी ड्युल डेक्स घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मागील काळात तीन हजार ७२२ अंगणवाड्यांपैकी केवळ २५० अंगणवाड्यांना ड्युल डेक्स पुरविले.

Nanded
Health Care News : जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा 'हे' 4 व्यायाम; हृदय अन् मन राहील निरोगी

अजूनही तीन हजार ४७२ अंगणवाड्यांतील चिमुकल्यांना ड्युल डेक्स बसण्यासाठी मिळाले नाहीत. दरम्यान, जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत २०२३-२४ या वर्षासाठी ड्युएल डेस्कची मागणी करण्यात आली. त्यानुसार २५ लाख रुपयांची निधी मंजूर झाला आहे. यातून आता ३८ अंगणवाड्यांना ड्युएल डेस्क व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामिण भागातील किशोरवयीन मुलींना स्पर्धेच्या युगात मागे राहू नयेत, यासाठी मोफत एमएस - सीआयटी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. मागील काळात जिल्ह्यात जवळपास पाचशे किशोरवयीन मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता पुन्हा यासाठी २५ लाखाची निधी मंजूर झाला आहे. त्यातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून ड्युल डेक्स व अन्य साहित्य खरेदीसाठी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर एमएस - सीआयटी प्रशिक्षणासाठी २५ लाख रुपयांचा निधीचे पत्र जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला प्राप्त झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निधी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

- रेखा कदम काळम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com