

Nanded News
esakal
नांदेड: शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता धडक कारवाई सुरू केली आहे. उत्तर नांदेडमधील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मोर चौक ते छत्रपती चौक या मार्गावरील अतिक्रमणांवर मंगळवारी (ता. २८) महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. जवळपास ५० ते ६० अतिक्रमणे हटवली. त्यामुळे अनेक वर्षांपासून गुदमरलेल्या या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.