धक्कादायक : शेवटसुद्धा चांगला नाही, यांच्या गलथान कारभारामुळे करावा लागला ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार

file photo
file photo

हनेगाव (ता. देगलूर, जिल्हा नांदेड) : काही व्यक्तींना नशिबी अनेक समस्यांना तोंड देत जीवन कंठावे लागते. परंतु काहीना मृत्यू आल्यानतंरही संकट त्यांचा पिछा सोडत नाहीत. असाच एक प्रकार देगलुर तालुक्यातील खुमतापूर गावात घडला. अंत्यसंस्काराला स्माशमामभूमीत कुठलीच सुरक्षीत जागा नसल्याने गावकऱ्यांनी भर पावसात चक्क चितेवर ताडपत्री धरुन मृतदेहाला भडाग्नी दिला. ह्या धक्कादायक प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. 

एकीकडे राज्य शासन ग्रामिण भागात स्मशानभूमीसाठी मोठा निधी ग्रामपंचायत स्तरावर खर्च करतो. परंतु काही गावात स्थानिक राजकारण आड येत असल्याने अनेक गावामध्ये स्मशानभूमिला जागा असूनही त्या जागेचा विकास केल्या जात नाही. स्मशान भूमीच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे अत्यावश्यक सोई सुविधा नसल्याले अक्षरशः मृतदेह चार तास पाण्यात ठेवल्यानंतर पाऊस कमी होत नसल्याने अखेर मृतदेहाच्या चितेवर ताडपत्री धरून अंत्यविधी करण्यात आला. या धक्कादायक व प्रचंड चीड आणणाऱ्या घटनेबद्दल खुतमापुर येथील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.  

शासनाच्या योजना कागदावरच 

शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात तसे आमदार, खासदार यांच्या निधीतून लाखोंचा निधी खर्च करण्यात येते. परंतु हानेगाव व खुतमापुर भाग हा स्मशानभूमीच्या विविध योजनेपासून आजसुद्धा वंचित आहे. माणूस जिवंत असताना तर सोडाच परंतु मेल्यानंतर सुद्धा शासनाच्या सोई सुविधा   मिळत नाहीत हे या भागातील जनतेचे दुर्दैव आहे. 

पावसात शारिरीक अंतर ठेवत मृतदेहावर अंत्यसंस्कार

खुतमापुर येथील रामा माणिक वाघमारे (वय ७५) यांचा शुक्रवारी (ता. २४) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी ठिकाणी गेल्यानंतर पाऊस सुरु झाला. आत्ता थांबेल, थोड्या वेळाने थांबेल परंतु तीन ते चार तास पाऊस थांबलाच नाही. यावेळी जवळपास चार तास समाज बांधवांनी पाऊस उघडण्याची वाट पाहिली. मात्र पाऊस उघडण्याचे चिन्ह दिसत नसल्याने अखेर चितेवर ताडपत्री धरली. शेवटी रिमझिम पावसात शारिरीक अंतर ठेवत मृतदेहला अग्नी देऊन अंत्यविधी केला. नागरिकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडून आणले असले तरी स्मशानभूमी ठिकाणी सोई सुविधा नसल्याने गावकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळें खुतमापुर येथील दलित स्मशानभूमी ठिकाणी स्मशानभुमिकडे जाण्यासाठी रस्ता, संरक्षण भिंत, पाण्याची व्यवस्था व इतर सोई सुविधा नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची अवकळा

हानेगाव (ता. देगलूर) येथील लिंगायत स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. शासनाकडे पाठपुरावा केला तरीही अद्याप लिांगायत समाजाला न्याय मिळाला नाही. याव्यतीरिक्त वझरा, कुंडली, सिवणी, कामाची वाडी, कोकनगाव लेणी व इतर वाडी- तांड्यात स्मशानभूमिकडे जाण्यासाठी रस्ता नाही. टीनशेड, पाणी नाही, याकडे मात्र आमदार व खासदार यांचे दूर्लक्ष झाले आहे. या भागातील स्मशानभूमिच्या सोई सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी माजी सभापती बाबू पाटील खुतमापूर, सामजीक कार्यकर्ते बालाजी चोपडे, सरपंच अनिल वलकल्ले, तुकाराम वाघमारे, सुधाकर टोके, सुरेए वाघमारे आदीनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com