
नांदेड : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आणि अनधिकृत पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. या मोहिमेसाठी विभागाने सहा विशेष पथके तैनात केली असून, २४ तास कडक नजर ठेवली जाणार आहे. शहरासह सीमावर्ती भागांमध्ये नाकाबंदी करण्यात येणार आहे.