नांदेड : दयानंद वनंजे यांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाने खळबळ

प्रल्हाद कांबळे
Saturday, 5 September 2020

हा प्रकार शनिवारी (ता. पाच) सकाळी सातच्या सुमारास मालेगाव रोड भावसारचौक परिसरात उघडकीस आला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

नांदेड : शहरातील तरोडा (बु) परिसरातील प्रकाशनगर भागात राहणारे दयानंद वनंजे यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हा प्रकार शनिवारी (ता. पाच) सकाळी सातच्या सुमारास मालेगाव रोड भावसारचौक परिसरात उघडकीस आला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

शहराच्या प्रकाशनगर भागातील दयानंद उजलू वनंजे यांचा राजकिय क्षेत्रात बड्या नेत्यासोबत वावर होता. परंतु त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह त्यांच्या घरापासून खूप दूर अंतरावर शनिवारी सकाळी सातच्या सुमारास आढळला. सर्वप्रथम त्यांची ओळख पटली नाही. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे. त्या नोटमध्ये त्यांनी माझ्या जिविताला धोका असल्याचे नमुद केले होते. तसे पत्र त्यांनी काही दिवसापूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले होते. त्यांच्या मृतदेहाजवळ एक पिवळ्या रंगाची विनानंबर असलेली पासींग न झालेली नवी कोरी दुचाकी पोलिसांनी जप्त केली. 

हेही वाचा कोरोनाची कुंटूर पोलीस ठाण्यात इंट्री : एक अधिकारी पाच कर्मचारी पाॅझिटिव्ह

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट 

घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. त्यानंतर प्रकरण गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यानी प्रभारी पोलिस अधीक्षक विजय पवार यांना ही माहिती दिली. स्वत : विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. फॉरेन्सीक लॅब, श्‍वान पथक यांनाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नौंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Excitement over Dayanand Vananje's partially burnt body nanded news