नांदेड : कारखान्यांची चौकशी राजकीय हेतूने प्रेरित; अशोक चव्हाण

अशोक चव्हाण यांचा केंद्रावर आरोप
अशोक चव्हाण
अशोक चव्हाण sakal

नांदेड : राजकीय हेतूने प्रेरित होऊन साखर कारखान्यांची चौकशी करण्यात येत आहे. देगलूर - बिलोली पोटनिवडणुकीचे मतदान शनिवारी (ता.३०) असून त्या आधी दोन दिवस ही कारवाई होत असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता.२८) प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणा अर्बन बॅंकेवर छापे टाकून चौकशी सुरू आहे. या चौकशीत अशोक चव्हाण यांच्या चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाचीही चौकशी करण्यात येत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अनेक कारखाने वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतात.

अशोक चव्हाण
Pune : कृषी उद्योजकतेला पाठबळ- दादा भुसे

त्यात नियमानुसार काम करण्यात आले असून कागदपत्रांचीही पूर्तता केली आहे. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. अनियमितता वाटत नाही. याआधीही चौकशी केली आहे. किती वेळा ती करणार? सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा हा प्रकार वाटतो. देगलूर - बिलोली पोटनिवडणुकीवर परिणाम व्हावा, यासाठी ही चौकशी लावण्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com