नांदेड : बनावट सोयाबीन प्रकरणी गुन्हा दाखल

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सोयाबीनचे बनावट बियाणे विक्री करून मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या कंपनी व वितरकाविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात फसवणूक व बियाणे अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की लोहा तालुक्यात अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली. त्यासाठी वाटेल ती किंमत देऊन लोहा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी लोहा शहरातील मोंढा येथून सोयाबीनची खरेदी केली. खरेदी केलेले सोयाबीन आपल्या शेतात पेरले मात्र ते बनावट असल्याने उगवले नाही. अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या. शेवटी लोहा पंचायत समितीचे कृषी अधिकारी व त्यांच्या पथकाने तक्रार त्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता सोयाबीनचे बियाणे निघाले नाही. या बियाण्यांचा नमुना कृषी विभागाने परभणी येथील कृषि विद्यापीठात परीक्षणासाठी पाठविला. विद्यापीठातील परीक्षण विभागाने या बियाणांची तपासणी केली असता हे बियाणे निकृष्ट व उगवण क्षमता नसलेले निष्पन्न झाले. 

लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यावरून कृषी अधिकारी शैलेश हरी वाबळे यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात ऋषिकेश रुपराव उबाळे राहणार एमआयडीसी प्लॉट नंबर 5 चिखली, तालुका बुलढाणा आणि राजकुमार मारुती बाबर राहणार करावली बुद्रुक तालुका पुरण जिल्हा सातारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री करे हे करत आहेत. जिल्ह्यातील हा आठवा गुन्हा असून हजारो शेतकऱ्यांना बनावट सोयाबीन बियाणांचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. संबंधित बनावट बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्याविरुद्ध शासनाने कठोर पावले उचलून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी तक्रारकर्त्या शेतकऱ्यांमधून होत आहे.

माजी नगराध्यक्ष एन. एफ. बांगर यांचे निधन

हिंगोली -  शहरातील वंजारवाडा येथील माजी नगराध्यक्ष नारायणराव फकिरराव बांगर यांचे शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात    पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर कयाधु नदी काठावरील स्मशानभूमीत शनिवारी ( ता. १८) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


हिंगोली येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने भरविण्यात येत असलेल्या १६५ वर्षा पेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेल्या दसरा मोहत्स्वात व सार्वजनिक गणेश मंडळात सक्रिय सहभाग घेत दसरा मोहत्स्वात हॉकी ,कुस्ती  स्पर्धा घेऊन प्रशासनाला सहकार्य करीत होते. उपनगराध्यक्ष असताना शहरातील विकासकामात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे अधिकारी, राजकीय नेत्या पासून ते नगरसेवक ,पत्रकार ,सामान्य नागरिकांशी आपुलकीने बोलत असत. त्यांनी हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असत.

 १९९२ ते १९९४ या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते

नगरसेवक ते नगराध्यक्ष असा त्यांच्या राजकीय प्रवास आहे. १९९२ ते १९९४ या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. शहरातील अनेक कार्यात ते सहभागी होते. व्यापारी संघटनेत देखील ते सहभागी होते. शहरात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात ते सक्रिय  सहभागी राहत होते. शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार कार्यक्रमात त्यांना विविध मान्यवरांनी श्रद्धाजंली अर्पण केली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार गजानन घुगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष जगजीत खुराणा, प्रकाशशेठ सोनी, जेष्ठ पत्रकार तुकाराम झाडे आदींची उपस्थिती होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com