
कर्जबाजारी वाढत असल्याने हाताला काम मिळविण्याच्या उद्देशाने परराज्यात किंवा शहराकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणा वाढत असून कोरोनामुळे कामधंदे यांची घडी विस्कटली.
शिवणी (ता. किनवट, जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील यंदा शेतीतून फारसे उत्पन्न मिळाले नसल्याने शेतकरी व शेतमजूर हतबल झाले आहेत. त्यातच गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. शेतीने पोटापाण्याचा प्रश्न सोडविला नसल्याने रोजगारासाठी गावाकडून शहराकडे तर काही जवळच्या राज्यात तेलंगनात स्थलांतर करु लागले आहेत.
कर्जबाजारी वाढत असल्याने हाताला काम मिळविण्याच्या उद्देशाने परराज्यात किंवा शहराकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणा वाढत असून कोरोनामुळे कामधंदे यांची घडी विस्कटली. कोरोना या संकटामुळे अनेकांना गावाकडे परत यावे लागले. यंदा शेतीने साथ दिली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला पाहावयास मिळत आहे. शेतीवर भरमसाठ खर्च, मात्र उत्पन्न अत्यल्प आले. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुराच्या हातालाही काम मिळत नाही.
हेही वाचा - नांदेड : हक्काचे घरकुल द्या, अन्यथा आमरण उपोषणातच सरण रचुन आत्मदहन करणार- बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती -
किनवट तालुक्यात मोठे उद्योगधंदे नसल्याने मजुरांच्या हाताला कामे नाहीत. घरी शेती आहे पण शेतीला पाणी नाही. सिंचनाचे कोणतेही साधन नसल्याने कोरोनाच्या काळात कामधंदा गेला, त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली. त्यामुळे कर्जबाजारी झाले. या वर्षी शेतीत पाहिजेत असे काम नसल्याने कामे कमी खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक जण गावाकडे परतले आहेत. गावांमध्ये रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने शहराकडे किंवा तेलंगनात गेल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पोटापाण्यासाठी काम धंदा केल्याशिवाय पर्याय राहिला नाही त्यामुळे बसस्थानकावर गर्दी पहावयास मिळत आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे