
गत पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या परिसरात पावसाचे प्रमाण बर्यापैकी होण्याने, पेरलेल्या पिकाची वाढ जोमदार झाल्याने उत्पन्न बऱ्यापैकी होईल अशी आशा बळावली असतानाच, दत्तू वर्षीप्रमाणे याही वर्षी परतीच्या पावसाने पुन्हा कहर केला.
घोगरी (जिल्हा नांदेड) : यंदा पाऊसमान चांगलं राहिल्याने, शेतकऱ्याच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तो पुन्हा नव्या स्वप्नांची पेरणी करायला सज्ज झाल्याचे चित्र आहे. भविष्याची कसलीही हमी नसताना तो धरणी मातेची कुश पुन्हा-पुन्हा उधळू पाहतोय. हे युगानयुगे असेच चालणार आहे.
गत पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या परिसरात पावसाचे प्रमाण बर्यापैकी होण्याने, पेरलेल्या पिकाची वाढ जोमदार झाल्याने उत्पन्न बऱ्यापैकी होईल अशी आशा बळावली असतानाच, दत्तू वर्षीप्रमाणे याही वर्षी परतीच्या पावसाने पुन्हा कहर केला. काढणीस आलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचल्याने, शिवाय फळाफुलांनी लदबदलेला कापूसही, बोंडे सडून वाया गेल्याने शेतीत टाकलेला खर्च ही निघतो की नाही या काळजीत बळीराजा आहे.
हेही वाचा - नांदेड : येणाऱ्या काळात कुठल्याच निवडणूकीत एमआयएमशी युती नाही- प्रकाश आंबेडकर -
गेली सहा महिन्यापूर्वी एका सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूनं अवघ्या जगावर स्वारी करून अखंड मानवजातीला ठाणबंद केलं. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेती मालाच अतोनात नुकसान झालं. नंतर परतीच्या पावसाने नुकसानीची राहिलेली कसर भरून काढल्याने बेजार झालेला बळीराजा हा आशावादी म्हणावा लागेल.
पाऊस मान चांगलं राहिल्यानं पुन्हा जुन्या कडू आठवणी विसरून पुन्हा नव्या स्वप्नांची पेरणी करायला सज्ज झाला आहे. शेतकऱ्यावर प्रतिवर्षी येणारी अस्मानी आणि सुलतानी संकट यंदा अधिकच गहिरी झाली असतानाच, व पेरलेले ही निघेल की वाया जाणार याची पूर्णपणे खात्री नसतानाही तो धरणी मातेची कूस पुन्हा पुन्हा उजळू पाहतोय. हे युगानुयुगे असं चालणार आहे. शेतकऱ्यांनी पेरावं, पुन्हा अस्मानी-सुलतानी संकटं येऊन वाया जात आहे. शासनाच्या वतीने अनुदान दिले जाव हे नित्याचं घडत असल्याने जगाचा पोशिंदा एका नव्या संकटात सापडलेला दिसतो आहे. यातून लवकर सावरून या जगावर पुन्हा बळीच राज्य येईल का हे पाहणे गरजेचे आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे