नांदेड : पेट्रोलपंपावरील इलेक्‍ट्रिक पॅनलला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire on Electrical panel due to short circuit on petrol pump

नांदेड : पेट्रोलपंपावरील इलेक्‍ट्रिक पॅनलला आग

नांदेड : धनेगाव जवळील चंदासिंग कॉर्नर येथील एका पेट्रोलपंपावरील इलेक्ट्रीक पॅनलला बुधवारी रात्री शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. एमआयडीसीतील अग्नीशमन दलाच्या पथकाने एका तासात आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. धनेगाव येथील चंदासिंग कॉर्नर रस्त्यावरील मुंजाजी पेट्रोलपंपावरील इलेक्ट्रीक पॅनलला जून रोजी रात्री सातच्या दरम्यान शाॅर्टसर्किट होऊन आग लागली.

याची माहिती व्यवस्थापक हणमंत मस्के यांनी एमआयडीसी येथील अग्नीशमन दलाला दिली. येथील अधिकारी अतुल माळवतकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पथकासह अग्नीशमनच्या एका बंबाच्या मदतीने एका तासात आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला. अग्नीशमन दलाचे अधिकारी अनिल देशमुख, संदीप सातुरकर, सतीश इंगळे, राहुल वाघमारे, मुकेश गिरी यांनी ही आग आटोक्यात आणली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Nanded Fire On Electrical Panel Due To Short Circuit On Petrol Pump

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top