esakal | नांदेड : फायरींग केलेला पिस्तुल लेंडी नदीतील पाताळगंगा डोहातून जप्त 

बोलून बातमी शोधा

file photo

पोलिसांनी मुख्य हल्लेखोराला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

नांदेड : फायरींग केलेला पिस्तुल लेंडी नदीतील पाताळगंगा डोहातून जप्त 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मुखेड तालुक्यातील निवळी परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील पिस्तूल चार दिवसांच्या अखंड परिश्रमानंतर देगलूरच्या लेंडी नदी पात्रातील पाताळगंगा डोहातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मुख्य हल्लेखोराला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

निवळी तालुका मुखेड येथील तिरुपती पपूलवाड हा ता. नऊ मार्च रोजी खाजगी कामानिमित्त देगलूर तालुक्यातील करडखेड येथे मित्र राजू रामलु मेडपलवारला भेटण्यासाठी गेला होता. त्याच्याकडून एख लाख रुपये घेतले. त्यानंतर तो गावाकडे दुचाकीवरुन निघाला. मात्र इकडे राजू मेडपलवार याच्यासोबत चर्चा करुन संगनमताने तिरुपतीला दिलेले एक लाख रुपये आपणच लुटायचे हा बेत आखला. त्यानंतर राजू मेडपलवार आणि त्याचा मित्र हरजीतसिंग बांडू टाक या दोघांनी तोंडाला रुमाल बांधून तिरुपतीचा पाठलाग केला. 

हेही वाचा - दुधना आटताच परभणीचे गोकुळ आटले

तिरुपती पपूलवाड हा नांदेड- बिदर मार्गावरील निवळी शिवारातील गणपती मंदिर परिसरात येताच पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी एकाने पिस्तुलमधून गोळई झाडली. यात तिरुपती या हल्ल्यात जखमी झाला. त्यानंतर तो थेट बाऱ्हाळी रुग्णालयात व त्यानतंर नांदेडला उपचार घेतला. त्याच्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी राजू मेडपलवार याला ताब्यात घेतले. त्यानंतर हरजीतसिंह टाक यालाही अटक केली. गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल लेंडी नदीच्या पाताळगंगा डोहात फेकल्याची कबुली दिली. मात्र यात डोहात चाळीस फुट पाणी असल्याने पिस्तुल कसा शोधावा. 

यानंतर पुणे येथून तरबेज व निष्णात व्यक्तीला पाचारण केले. मात्र त्याच्या हाती काही लागले नाही. शेवची डोहातील पाणी उपसण्याचे पोलिसांनी ठरविले. तब्बल चार दिवस पाणी उपसल्यानंतर फेकून दिलेला पिस्तुल पोलिसांना आढळला. तो त्यांनी जप्त केला. यासाठी देगलुरचे पोलिस निरीक्षक भगवान धबडगे, फौजदार बसवराज जाकीकोरे, जनाबाई सांगळे, दीपक जोगे व सहकारी तसेच मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी परिश्रम घेतले.