esakal | नांदेड : आयपीएलवर सट्टेबाजी, पाच जणांना अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शहरात स्थानिक गुन्हे शाखेने तर देगलूरमध्ये देगलूर पोलिसांनी कारवाई करुन पाच जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सट्टा जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करुन शिवाजीनगर व देगलुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : आयपीएलवर सट्टेबाजी, पाच जणांना अटक 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात मटका, जुगारासोबतच आता आयपीएल क्रिकेटव सट्टा लावून लाखोंची उलाढाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अवैध धंद्याची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी कडक भुमिका घेतली आहे. सध्या आयपीएलचा हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणावर सट्टा लावण्यात येत आहे. या माहितीवरुन शहरात स्थानिक गुन्हे शाखेने तर देगलूरमध्ये देगलूर पोलिसांनी कारवाई करुन पाच जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सट्टा जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करुन शिवाजीनगर व देगलुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या नवा मोंढा परिसरात सुरु असलेल्या आयपीएलच्या सट्टा जुगाराची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी खात्री करुन आयपीएल सट्टा चालणाऱ्या अड्ड्यावर फौजदार आशिष बोराटे यांच्या पथकाला पाठविले. श्री. बोराटे यांनी आपले सहकारी संजय केंद्रे, बालाजी तेलंग, गंगाधर कदम आणि हेमवती भोयर यांना सोबत घेऊन जुगार अड्डा गाठला. या पथकाने नविन मोंढा परिसराती बिसेननगर भागातील हरिसिंह परमार यांच्या घराच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या सट्टा बाजारावर छापा टाकला. यावेळी राहुल किसनराव श्रीश्रीमाळ आणि हरिसिंग परमार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून श्री. गणेश क्रिकेट ॲप आणि ताज ७७७ स्पोर्टसवर सट्टा खेळत व खेळवित होते. त्यांच्याकडून पाच मोबाईल, एक लॅपटॉप आणि क्रिकेट सट्ट्याचा हिशोब देणारी वही असा ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अशिष बोराडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाअवैध वाळू उपसा : यापुढे तलाठी, मंडळ अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर -

देगलुरमध्येही सट्टा

क्रिकेट सट्ट्याचे लोन शहरातच नव्हे तर ग्रामीण स्तरावर पोहोचल्याचे देगलूर येथे झालेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. मनुर नाका ते देगलूर रोडवरील राधिका हॉटेलच्या समोर मोकळ्या मैदानावर आयपीएल क्रिकेटच्या मॅचवर सट्टा जोरात सुरू असल्याची माहिती देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांना मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करून शंकर अशोक गुळवे, सचिन माळी आणि कपील पवार हे क्रिकेटच्या सामन्यावर पैसे लावून मुख्य सूत्रधार सचिन माळी याला मोबाईलवरून सट्टा देत होते. आयपीएल क्रिकेट मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध केके राजस्थान या दोन टीममध्ये सामना चालू होता. यावेळी पोलिसांनी नगदी साडेतीन हजार, मोबाईल असा एकूण साडेआठ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस नाईक मोहन कंधारे यांच्या फिर्यादीवरून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top