esakal | नांदेड : पाच शेतकऱ्यांना सौरकृषी पंपाचे कोटेशन; जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे सौरकृषीपंप कार्यान्वीत 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पध्दतीने कृषीपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी,

नांदेड : पाच शेतकऱ्यांना सौरकृषी पंपाचे कोटेशन; जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे सौरकृषीपंप कार्यान्वीत 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधून महावितरणने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाचे कोटेशन सुपूर्द करण्यात आले.

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पध्दतीने कृषीपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहीत सौर कृषिपंप योजनेचे कार्य प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत वीजचे स्वप्न पुर्णत्वास येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यातील एक हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना सौरकृषी पंपाची वीज जोडणी देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त भोकर तालूक्यातील डोर्ला या गावचे शेतकरी मारोती कोंडीबा देवतूले, बिलोली तालूक्यातील गुजरी येथील रुक्मीणबाई मारोती चेंदे, नायगाव तालूक्यातील देगाव येथील संजय माधवराव गायकवाड, हदगाव तालूक्यातील पिंगळीचे निशीकांत पांडूरंग कोल्हे आणि अर्धापूर तालूक्यातील मालेगाव येथील रावसाहेब किशनराव इंगोले या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कोटेशन सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी नांदेड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींना कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 ची सविस्तर माहिती देवून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामीण विभागाचे कार्यकारी आर. पी. चव्हाण, प्रभारी कार्यकारी अभियंता ( प्रशासन ) एन. व्ही. मारलेगावकर, कनिष्ठ अभियंता एस. डी. जोशी तसेच श्रीधर आणेराव यांनी परिश्रम घेतले.  

loading image