esakal | नांदेड : शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जण जखमी ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; लोहा शहरातील घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लोह्यातील प्रमुख कार्यकर्ते व पोलिसांच्या संयमी भूमिकेमुळे सामाजिक तणाव निवळला 

नांदेड : शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जण जखमी ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; लोहा शहरातील घटना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोहा (जिल्हा नांदेड) : शेतात बोअर पडला त्यात विद्युत मोटार टाकण्यासाठी साहित्य घेऊन जात असताना त्यांच्याच शेताच्या वाटेवर दारु पित बसलेल्या पोलेवाडीतील टोळक्याने बाजूला सरका, कस काय म्हणालास यावरुन वादावादी केली व पोले गावातील लोकांना बोलावून जातीवाचक शिवीगाळ व प्राणघातक हल्ला जोंधळे कुटुंबियांवर केला. यात पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी लोहा शहरातील आयटीआयच्या परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरा लोहा पोलिसांत अॅट्रासिटी व प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जुन्या शहरातील विजय इरबाजी जोंधळे, मधुकर इरबाजी जोंधळे हे शासकीय गोदामात काम करतात. आयटीआय लगतच्या माळावर त्यांनी गायरान मालकीची जमीन आहे. मागील तीन दिवसापूर्वी या भावंडांनी आपल्या कष्टाच्या कामातून पैसे जमा केले व बोअर पाडला. त्याला खूप पाणी लागले. 
शुक्रवारी मधुकर इरबाजी जोंधळे ( वय ४५), त्यांचा जावई मंगेश विजय पंडित (वय 32), सोहन मधुकर जोंधळे (वय २१), पवन मधुकर जोंधळे ( वय १७) व स्वतः फिर्यादी धीरज विजय जोंधळे (वय २५)आपल्या शेतात मोटार टाकण्याचे काम करत होते. पोलेवाडीत बाळू मामांच्या मेंढ्याचा समारोप होता. वाजत गाजत डीजे लावून या मेंढ्या बेरळीकडे गेल्या. आरोपीतील काही जण जोंधळे यांच्या शेतात जाणाऱ्या रस्तात दारु पित बसले यांनी भाऊ बाजूला सरका.. समान नेत आहोत लागेल..असे सांगितले पण दारुच्या नशेत असलेल्यानी मंगेश व पवन यांच्याशी हुज्जत घातली आणि पोलेवाडीत फोन करून तरुणांना बोलावून घेतले.

हेही वाचानांदेड : मुदखेड येथे माजी नगरसेवकासह भाजपच्या शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल -
 
दता बाजगिर, संदीप बाजगिर, धीरज हाके, वैभव हाके, कमलाकर बाजगिर व इतर सात- आठ जण यांनी शेतात काम करणाऱ्या या जोंधळे कुटुंबियांना लोखंडी गजाळी, लाकडी काढ्या फायटर, दगड- धोंड्यानी डोक्यात पाठीत व गुप्तांगावर बेदम मारहाण केली. यात मंगेशला एका झुडपात फेकून दिले. अर्ध्या तासाहून अधिक काळ या टोळक्यानी जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांना ही माहिती देण्यात आली. मारेकरी फरार झाले असे फिर्यादी धीरज जोंधळे यांनी सांगितले. या हाणामारीत मधुकर जोंधळे त्यांचे मुले, भाचा व जावई मंगेश व धीरज याना बेदम मारहाण झाली. या पाचही जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, पोलिस निरीक्षक भागवत जायभाये, पोलीस उपनिरीक्षक एम. जी. सोनकांबळे व पोलिसांनी तत्परता दाखवीत बंदोस्त वाढविला.

लोह्यात जुनी पण नव्याने सुरू झालेल्या वाईन मार्ट परिसरात सतत हाणामारी होत असून लोह्यचे सामाजिक वातावरण दूषित होत आहे.
फिर्यादी धीरज जोंधळे ( वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी दत्ता बाजगीर, संदीप बाजगीर, कमलाकर बाजगिर ,धिरज हाके ,वैभव हाके व इतर सात ते आठ  जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करत आहेत.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

loading image
go to top