esakal | नांदेड : पाच मिनाती पगार दिवाळी अंधरेम चल गी... बंजारा महिलांचा प्रशासनास सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

साहेब पाच छो मिनाती पीसा मळे कोणी, हमार दसरा दवाळी अंधआराम चलगी, काई खावास राई पिओ, तम्हार दिवाळी हुसे तीवेगी, पगार दवाळई पहिले बटा लिदे, हमारकु काई असे म्हणत दिवाळीपूर्वी पगार, बोनस उचलणार्‍या महसूल कर्मचाऱ्यांना लिलाबाई गणपत राठोड या निराधार महिलेने सवाल उपस्थित केला आहे.

नांदेड : पाच मिनाती पगार दिवाळी अंधरेम चल गी... बंजारा महिलांचा प्रशासनास सवाल

sakal_logo
By
बालाजी कोंडे,

माहूर (जिल्हा नांदेड) : संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी असल्या तरी लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळत नसल्याने सदर प्रकाराच्या निषेधार्थ शेकडो लाभार्थी महिलांनी ता. १७ नोव्हेंबर रोजी माहूर तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. लाभार्थ्यांच्या मागण्यांची वेळेत दखल घेतली गेली नाही तर उपोषणाचा इशारा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे या महिलांनी दिला आहे

साहेब पाच छो मिनाती पीसा मळे कोणी, हमार दसरा दवाळी अंधआराम चलगी, काई खावास राई पिओ, तम्हार दिवाळी हुसे तीवेगी, पगार दवाळई पहिले बटा लिदे, हमारकु काई असे म्हणत दिवाळीपूर्वी पगार, बोनस उचलणार्‍या महसूल कर्मचाऱ्यांना लिलाबाई गणपत राठोड या निराधार महिलेने सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा -  नांदेड : येणाऱ्या काळात कुठल्याच निवडणूकीत एमआयएमशी युती नाही- प्रकाश आंबेडकर -

निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग, शरीर व्याधीग्रस्त व निराधार विधवांना आर्थिक आधार मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरु करण्यात आली आहे. भूमिहीन, शेतमजूर, महिला निराधार, विधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी १९९१ पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना तर ६५ वर्षावरील आर्थिक दृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी केंद्र सरकारने २००४ मध्ये श्रावण बाळ सेवा योजना सुरु केली.

मागील पाच महिन्यांपासून योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान मिळाले नसल्याने निराधार लाभार्थी अधिकच निराधार झाले आहेत. परिणामी निराधारांना दिवाळी पैशाविना अंधारात साजरी करावी लागली. तेव्हा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. या आठवड्यात मानधन मिलाले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे बंजारा समाजाच्या निराधार महिलांनी इशारा दिला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे