नांदेड : माजी मंत्री सावंतांच्या घरी पिस्तूलधारी तरुणाचा प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

former minister DP Sawant

नांदेड : माजी मंत्री सावंतांच्या घरी पिस्तूलधारी तरुणाचा प्रवेश

नांदेड : माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्या शिवाजीनगर भागातील ‘आई’ या निवासस्थानी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास एका पिस्तूलधारी तरुणाने प्रवेश करून नोकराला भीती दाखवत मारहाण केली. पन्नास हजारांची मागणी केली. सावंत यांनी घराबाहेर येऊन इतरांना बोलावताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सावंत यांच्या निवासस्थानी सकाळी साडेनऊच्या सुमारास तरुण आला होता. मी बीडचा असून माझ्या वडिलांनी तुम्हाला भेटून मदत घेण्यास सांगितले आहे, असे त्याने सांगितले. बीडमधील आमदार किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सांगून सावंत यांनी त्याला पाठवून दिले. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास तो पुन्हा घरी आला. मागील दरवाजाने स्वयंपाकघरात प्रवेश करून त्याने सुभाष पवार या नोकराला पकडले. त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून पन्नास हजारांची मागणी केली. काय झाले हे पाहण्यासाठी गेले असता सावंत यांनाही त्याने धमकावले. सावंत यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पवार यांना डोक्यात मारून जखमी केले.

पिस्तूल नकली

साहील माने (वय ३५) असे या तरुणाचे नाव असून तो बीड येथील रहिवासी आहे. त्याच्या जमीन प्रकरणासंदर्भात तो आला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. तपासणीनतर त्याच्याकडील पिस्तूल नकली असल्याचे आढळले. तेही जप्त केले आहे. त्याच्या सोबतच्या एकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिली.

Web Title: Nanded Former Minister Dp Sawant Young Man With Pistol Enters House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedcrimeSakalPistol
go to top