नांदेड : विष्णुपुरीचे चार तर लिंबोटीचे दोन दरवाजे उघडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

नांदेड : विष्णुपुरीचे चार तर लिंबोटीचे दोन दरवाजे उघडले

नांदेड : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा मागच्या चार दिवसांपासून हजेरी लावली आहे. परिणामी करपू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पाऊसधारांमुळे जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. यात नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्पही पुर्ण क्षमते भरल्याने प्रकल्पाचे चार तर लिंबोटीचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. सुमारे वीस दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरुवात केली होती. दरम्यान मागच्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेली लावली असून, गुरुवारपासून (ता.आठ) जिल्ह्यात अनेक भागात जोराच्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सलग तीन दिवस म्हणजे रविवारी (ता.११) दुपारपर्यंत संततधार पाऊस कायम होता. कधी ऊन पाऊस तर कधी उघडीप अशा पद्धतीने चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना नवसंजिवनी मिळाली असून, पुन्हा ही पिके बहरताना दिसत आहेत.

शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

ऐन बहरात पीके आली असताना पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र, चार दिवसांपासून अधून-मधून होत असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोकर तालुक्यात एका महिलेचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, ग्रामीण भागालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर, भोकर भागात पावसाचा चांगला जोल होता. या पावसाने काही ठिकाणी पुरपरिस्थितीही निर्माण झाली. आणखी दोन दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहेत.

जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब

दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे पाणी प्रकल्प, सिंचन तलाव, बंधारे, नदी, नाले, ओढे, शेततळे, विहिरी हे भरत आले होते. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली होती. मात्र, चार दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ झाली. बहुतांश पाणी प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत.

विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

चार दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्ही पूर्ण क्षेमतेने भरला असून, रविवारी (ता.११) प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले आहेत. चारही दरवाजातून सुमारे ५५ हजार ७९६ क्युकेस एवढा पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरु आहे. तर लिंबोटी धरणातही पाणीसाठी भरपूर झाल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. दोन दरवाजातून ६६८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Web Title: Nanded Four Doors Vishnupuri Two Doors Limboti Opened

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..