
या प्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार जणांना अटक करुन देगलूर न्यायालयासमोर मंगळवारी (ता. पाच) हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश सुधीर बर्डे यांनी ता. आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.
देगलुर (जिल्हा नांदेड ) : शहरातील साई भोजनालय चालवणाऱ्या कुटुंबातील मातेसह मुलाचा पाण्याच्या टाकीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार (ता. चार) जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली होती. या प्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार जणांना अटक करुन देगलूर न्यायालयासमोर मंगळवारी (ता. पाच) हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश सुधीर बर्डे यांनी ता. आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.
शहरातील शहाजीनगर भागात राजेश निलावार यांचे व्यापारी कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर भुतंनहिपरगा येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या शहरातील रामपूर रोडवरील गणेशनगर येथे वास्तव्यास असलेले मठपती कुटुंब साई भोजनालय चालवून आपला उदरनिर्वाह चालवतात.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात ९१० ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी सुरू; १०३ ग्रामपंचायती बिनविरोध -
सोमवारी (ता. चार) रोजी दुपारी मठपती कुटुंबातील शिवलीला साईनाथ मठपती (वय २३) व तिचा मुलगा प्रज्योत साईनाथ मठपती (वय तीन वर्षे) हे दोघे चौथ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये तरंगत असताना आढळून आले. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पाण्याच्या टाकीबाहेर दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. शिवलिला हिच्या कपड्यामध्ये सुसाईड नोट पोलिसांना सापडली. त्यात तीने मला कोणाचाही त्रास नसल्याचे लिहिले होते. मात्र माहेरच्या मंडळीच्या तक्रारीवरुन अखेर पतीसह सासरच्या मंडळीवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पती साईनाथ गणेश मठपती, सासु शोभाबाई गणेश मठपती, दीर रवी गणेश मठपती जावू पूजा मठपती यांना अटक केली. या चार जणांना पोलिसांनी देगलुर न्यायालयासमोर हजर केले. प्रथमवर्ग न्यायाधीश सुधीर बर्डे यांनी या सर्वांना ता. आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे