esakal | नांदेड - शुक्रवारी ८९ अहवाल पॉझिटिव्ह , मागील पंधरा दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत कमालीची घट 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शुक्रवारी (ता. २३) एक हजार ६२५ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ५७६ इतकी झाली आहे.

नांदेड - शुक्रवारी ८९ अहवाल पॉझिटिव्ह , मागील पंधरा दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत कमालीची घट 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील पाच महिण्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वाढते आकडे बघून अनेकांना धडकी भरत होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालिची घट झाली आहे. शुक्रवारी (ता.२३)च्या अहवालात १७० रुग्ण कोरोनामुक्त, ८९ जण पॉझिटिव्ह, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी (ता. २२) संशयीत म्हणून तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता. २३) एक हजार ६२५ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ५७६ इतकी झाली आहे. शुक्रवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील हडको येथील पुरुष (वय ५७), भोकर येथील पुरुष (वय ७०) या दोघांसह जिल्हा रुग्णालयातील सिडको नांदेड पुरुष (वय ५०) या तीन पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ४९८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- नांदेड - वीजचोर आकडेबहाद्दरांना महावितरणाचा ‘शॉक’ ३९ गावांत धडक मोहीम, एक हजारापेक्षा अधिक जणांवर कारवाई​

शुक्रवारी १७० कोरोनाबाधित रुग्ण बरे 

दुसरीकडे विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील- सात, जिल्हा शासकीय रुग्णालय- १२, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईन मधील - ९०, मुखेड- एक, किनवट- चार, धर्माबाद- पाच, माहूर- एक, कंधार- एक, बिलोली- चार, नायगाव- पाच, लोहा- दोन, हदगाव- चार आणि खासगी कोविड सेंटरमधील ३५ असे १७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली.

हेही वाचले पाहिजे- सीईओ वर्षा ठाकूर जेंव्हा उंबरठ्यातील आदिशक्तीला बोलते करतात... ​

१६ हजार ९०६ रुग्ण कोरोनामुक्त 

गुरुवारच्या आरटीपीसीआर व ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे घेण्यात आलेल्या स्वॅबमध्ये नांदेड वाघाला महापालिका क्षेत्रात- ४६, नांदेड ग्रामीण- एक, किनवट-नऊ, मुदखेड-चार, मुखेड-दोन, उमरी-तीन, अर्धापूर-दोन, देगलूर-१०, माहूर-एक, नायगाव-एक, भोकर-दोन, कंधार-दोन, बिलोली-एक, परभणी-तीन, यवतमाळ-एक आणि हिंगोली-एक असे ८९ कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. आतापर्यंत १८ हजार ५७६ कोरोना बाधित झाले असून, त्यापैकी १६ हजार ९०६ कोरोनामुक्त झाले आहे. सध्या एक हजार ४३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यामधील ४३ पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

कोरोना मीटर ः 

शुक्रवारी पॉझिटिव्ह ८९ 
शुक्रवारी कोरोनामुक्त- १७० 
शुक्रवारी मृत्यू- तीन 
एकूण कोरोना पॉझिटिव्ह- १८ हजार ५७६ 
एकूण कोरोनामुक्त- १६ हजार ९०६ 
एकूण मृत्यू- ४९८ 
उपचार सुरू- एक हजार ४३ 
गंभीर रुग्ण- ४३ 
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत- २८०