esakal | नांदेड : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन घरांना आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अर्चना महादेव बोयावार या महिलेच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन घरांना आग लागली. त्यामध्ये श्रीमती बोयावार यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

नांदेड : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन घरांना आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : देगलूर तालुक्यातील कोटेकल्लुर येथील एका घरातील घरगुतू वापराचे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन घरांना आग लागली. यात जवळपास दोन लाखाच्या संसारोपयोगी साहित्याची जळून राख झाली. देगलूप पोलिस ठाण्यात जळीतप्रकरणी नोंद करण्यात आली. ही घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडली.

अर्चना महादेव बोयावार या महिलेच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन घरांना आग लागली. त्यामध्ये श्रीमती बोयावार यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेने खळबळ उडाली असून देगलूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने सायंकाळी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

हेही वाचा -  नांदेड : गावठी कट्टा आणि एअरगण पिस्टल वापरणारा आरोपी पोलिस कोठडीत -

कोटेकल्लुर येथील अर्चना महादेव बोयावार ही महिला शुक्रवारी सायंकाळी घरांमध्ये स्वयंपाक करीत असताना अचानकपणे गॅसचा स्फोट होऊन आग लागली. त्यामध्ये घरगुती साहित्य, टीव्ही, कुलर, पंखा व संसारोपयोगी साहित्य तसेच धान्य, कपडे, शिलाई मशीन, कापूस असे एक लाख रुपयांचे साहित्य या आगीत जळून खाक झाले. या आगीने बाजूस असलेल्या गणपत लालू बोयावर यांच्या घराला जवळ केले. त्यांचे या आगीत ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाला शहापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विलास यालावार यांनी जेवणाची व निवासाची सोय उपलब्ध करुन दिली. पीडित कुटुंबाला प्रशासनातर्फे तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.