Fly91
sakal
नांदेड - येथील श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळावरून प्रलंबित असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. ‘फ्लाय-९१’ या खासगी कंपनीने आपल्या ताफ्यात दोन नवीन विमाने भाडेतत्त्वावर घेण्यासाठीचा करार यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यामुळे नांदेडहून गोवा विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात कंपनीकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली असून, लवकरच ही सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.