नांदेड : अवैध वाळू उपसाविरोधात कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Godavari river Action against illegal sand mining

नांदेड : अवैध वाळू उपसाविरोधात कारवाई

मारतळा : येळी (ता. लोहा) येथील गोदावरी नदी घाटावर बिहारी मजुर व तराफ्याच्या साह्याने अवैद्य वाळू उपसा सुरू होता. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या पथकाने बुधवारी सकाळी बोटीने नदीतून प्रवास करत अवैध वाळू उपसा करणारे १७ तराफे पकडून एकत्र करत, कर्मचारी व मजुरांच्या मदतीने त्याची मोडतोड करत नष्ट करण्यात आले.

लोहा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले व शेवटच्या टोकावरील येळी, कौडगाव, कामळज, चिंचोली या घाटातून बिहारी मजूर व तराफ्याच्या साह्याने अवैद्य वाळू उपसा सुरू होता. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार अशोक मोकले यांनी अचानक बुधवारी सकाळी लोहा महसूलचे धडक कारवाई पथक बोटीतून टेहळणी करत येळी, कामळज, कौडगाव, चिंचोली घाटावर आले.

तेव्हा अवैध वाळू उपसा करणारे मजूर तराफे सोडून तहसीलदार आले म्हणताच पळ काढला. तेव्हा पथकातील कर्मचाऱ्यांनी सदर १७ तराफे पकडून एकत्र करत मजुराच्या मदतीने त्यांची मोडतोड करून नष्ट केले. या वेळी त्यांच्या समवेत तलाठी मोतीराम पवार, मनोज जाधव, संदीप कल्याणकर, सतीश शिंदे, संतोष आस्कुलकर, परशुराम जाधव, भुरेवार पाईकराव, कावळे, मांडवगडे आदींची समावेश होता.

Web Title: Nanded Godavari River Action Against Illegal Sand Mining

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top