

Nanded News
esakal
नांदेड: गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत २.० योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाची मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोइफोडे यांनी रविवारी (ता.२६) पाहणी करून कामे तातडीने पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देश दिले. शहरातील नाल्यांमधून थेट नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यावर त्यांनी भर दिला.