नांदेड - गोदावरी अर्बनची १०००  कोटीच्या ठेवीची  उत्तुंग भरारी

शिवचरण वावळे
Friday, 28 August 2020

गणेशोत्सवामध्ये गौरीपूजनाच्या पूर्वसंध्येला गोदावरी अर्बन मल्टिस्टेट यशाचे हे शिखर गाठले याबद्दल  सर्व सभासद ,ठेवीदार ,ग्राहक यांचे  आभार अध्यक्ष राजश्री पाटील यांनी मानले

नांदेड :  सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी करणारी गोदावरी अर्बन मल्टिस्टेट ने अत्यंत कमी कालावधीत एक हजार कोटी रुपयाच्या ठेवीचा जादुई आकडा पार करत उत्तुंग भरारी घेतली आहे. या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील आणि अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे . 

गणेशोत्सवामध्ये गौरीपूजनाच्या पूर्वसंध्येला गोदावरी अर्बन ने यशाचे हे शिखर गाठले असून याबद्दल आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व सभासद ,ठेवीदार ,ग्राहक यांचे  आभार अध्यक्ष राजश्री पाटील यांनी मानले.खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून सात वर्षांपूर्वी  गोदावरी अर्बनची स्थापना करण्यात आली होती.खासदार हेमंत पाटील यांची दूरदृष्टी, अध्यक्ष राजश्री पाटील यांचे काटेकोर नियंत्रण आणि संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांची तंत्रशुद्ध अंमलबजावणी यामुळे "गोदावरी" ने अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि महाराष्ट्रासह तब्बल पाच राज्यात शाखेचे जाळे पसरवत  त्या-त्या भागातील व्यापार उद्योगाला आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचे काम केले आहे.

हेही वाचा- कृष्णूरच्या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील जुगार, कुंटुर पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना केली अटक ​

आल्पावधित बँख यशाच्या शिखरावर

 १००० कोटींच्या ठेवीचा हा अभिमानस्पद टप्पा आणि जादुई आकडा पार करताना संस्थेच्या दैनिक आवर्त ठेव प्रतिनिधींनी अत्यंत परिश्रम घेतले आहे .त्यांच्या या परिश्रमामुळेच बँकेला हजारो ग्राहकांचा व ठेवीदारांचा आशीर्वाद व विश्वास प्राप्त झाला आहे असे राजश्री पाटील यांनी नमूद केले. अत्यंत कमी भांडवलात सुरु झालेल्या गोदावरी अर्बनने मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्नांनी एकेक यशोशिखर गाठले आहे. 

हेही वाचा- Video-नांदेडला आईसक्रीम कोल्ड स्टोरेज आगीत जळून खाक

अद्ययावत ज्ञान हि या यशाची गुरुकिल्ली

गोदावरी अर्बनच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सहकाराचे सर्व आदर्श निकष पाळत ग्राहकांना सेवा  दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वच व्यवसायाचे अवसान गळाले असताना गोदावरीची हि चढती कमान वाखाणण्याजोगी आहे. यासाठी रोजच ३१ मार्च आहे असे समजून नियोजन करणारे आणि सर्व अधिकारी कर्मचारी याना वेळोवेळी प्रशिक्षित आणि प्रोत्साहित करणारे व्यवस्थापकीय संचालक तांबेकर सरांचे सहकार क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान हि या यशाची गुरुकिल्ली आहे असेही राजश्री पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

 गोदावरीला यशाच्या आणि विश्वासाच्या या टप्यावर घेऊन जाण्यासाठी अनेक हात सत्कारणी लागले आहेत यामध्ये  संचालक मंडळ, झपाटलेल्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणारे संस्थेचे अधिकारी ,कर्मचारीवृंद, सर्व दैनिक, आवर्त ठेव प्रतिनिधी यांच्यासह सन्माननीय सभासद,प्रसारमाध्यमे,यांचे देखिल अध्यक्ष राजश्री पाटील यांनी आभार मानले .

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Godavari Urban's Rs 1,000 Crore Deposit Skyrockets Nanded News