नांदेड : ग्रामीण तंत्रनिकेतनमध्ये शासनमान्य सुविधा केंद्र

प्राचार्य डॉ. विजय पवार : प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीस सुरुवात
Nanded Government approved facility center Technical School
Nanded Government approved facility center Technical Schoolsakal

नवीन नांदेड : तंत्रशिक्षण संचलनालया मार्फत १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक प्रथम वर्ष तर १२वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक थेट द्वितीय वर्षासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिले जातात. पॉलिटेक्निक प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. तरी १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी तर १२ वी विज्ञान, एमसीव्हीसी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केवळ अधिकृत फॅसिलिटेशन सेंटर्स मधूनच करावी असे आवाहन ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी, नांदेडचे प्राचार्य डॉ.विजय पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी तंत्रनिकेतन संस्थांसाठी एकच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावयाचा आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष संस्थेत जाऊन फिजिकल पद्धती किंवा ऑनलाईन स्क्रूटनीद्वारे अर्ज भरता येतो. विद्यार्थ्यांनी कॅफे किंवा मोबाईलद्वारे अर्ज भरल्यानंतर त्याची अधिकृत सुविधा केंद्रातून पडताळणी करून दाखल करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाद ठरतो. म्हणून अधिकृत सुविधा केंद्रातूनच अर्ज भरावेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.dte.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अद्याप दहावीचा निकाल जाहीर झाला नसला तरी ऑनलाईन अर्ज भरता येतील. नोंदणीत विद्यार्थ्यांना परीक्षेचा बैठक क्रमांक द्यावा लागेल, त्यासाठी गुणपत्रिकेची आवश्यकता असणार नाही. दहावी निकालानंतर मिळालेले गुण थेट विद्यार्थ्यांच्या अर्जात समाविष्ट करण्यात येतील. पॉलिटेक्निक प्रथम वर्षाचे अर्ज हे ता.३० जून तर थेट द्वितीय वर्षाचे ता. आठ जुलै २०२२ पर्यंत भरता येतील. यासाठी विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रे जसे जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व, नॉन-क्रिमीलेअर, डोमेसाइल, (एस टी प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र), आधार कार्ड, फोटो इत्यादींची पूर्तता करावी लागेल. विद्यार्थ्यांनी सुविधा प्रथम वर्षासाठी केंद्राधिकारी प्रा. फेरोज पठाण व थेट द्वितीय वर्षासाठी एस. एम. मुळे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य डॉ.विजय पवार यांनी केले आहे.

रोजगाराभिमुख ‘आय स्कीम अभ्यासक्रम’

औद्योगिक क्षेत्राच्या गरज लक्षात घेऊन तंत्रशिक्षण मंडळ रोजगाराभिमुख ‘आय स्कीम अभ्यासक्रम’ राबवित आहे. उद्योग जगताच्या गरजा, प्रात्यक्षिकांवरील अधिक भर, लेटेस्ट ट्रेंड्स व अद्यावत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव यामुळे उद्योग क्षेत्रात नोकरीच्या प्रचंड संधी विद्यार्थ्यांना मिळत आहेत. सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकलसह कंप्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन या शाखांना सुवर्णकाळ प्राप्त झाला आहे. त्यामुळे १०वी १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा असे प्राचार्य डॉ.विजय पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com