नांदेड : सरकार मायबाप आता पुन्हा लाॅकडाऊन नको; हातावर पोट असणाऱ्या लहान व्यावसायिकांची विनंती

file photo
file photo
Updated on

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील ग्रामीण भागातील शिवणी हे मुख्य बाजारपेठ असून या परिसरातील लहान लहान व्यावसायिक शिवणी येथे आपले व्यवसाय करुन त्यावर मिळकतीत आपल्या संसाराचा गाडा हाकत असतात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आमच्यासारख्या छोट्या व्यवसायिकांचे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

नवीन वर्षापासून सर्व काही पूर्वपदावर येत असताना आमच्या व्यावसायाला चालना मिळाली नाही. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने नांदेड जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसाचे कडक लाॅकडाऊन लावण्यात आले. ता. पंचवीस मार्च ते चार फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडून लाॅकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे लहान व्यावसायिक शरबत, उसाचे रस, चांभार, खाद्यपदार्थाची गाडी चालवणारी, चहा विक्रेते, चणे- फुटाणे विक्रेते अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांना याचा फटका बसणार आहे. लहान व्यवसायातून त्यांचा पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असतो. परंतु अशा अचानक उद्भवलेल्या संकटामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

शिवणी येथील ऊसाच्या रसाची विक्री करणारे माणिक गुरदळे यांनी बोलताना सांगितले की, मी उन्हाळा आला म्हणून ऊसाच्या रसाचा व्यवसाय करण्याचे ठरवून मी ऊसाचा रस काढण्याची मशीन विकत आणली आहे. ही मशीन मी अँटोवर बसवुन रसाची विक्री करतो. त्यासाठी लागणारा ऊस मला पन्नास किलोमीटर अंतरावरुन आणावा लागतो. यासाठी पंधरा दिवस चालावा यासाठी ऊस विकत आणला असून तो ऊस लाँकडाऊन जाहीर झाल्यामुळे मला जनावरांना टाकावा लागत असून माझे नुकसानच होणार आहे. तसेच गावोगावी दुचाकीवरुन फिरुन कपडे विकणारा व्यावसायिक चंद्रसिंग राठोड यांनी सांगितले की मी रोज आपल्या दुचाकीवरुन खेड्यांनी फिरुन कपडे विकण्याचा व्यवसाय करतो. सकाळी दहा वाजेपर्यंत खेड्यानी फिरुन कपडे विकून घरी येऊन बारा वाजल्यापासून शिवणीच्या बससट्ॅन्डवर पलंगावर कपडे विकत असतो. त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून घरगाडा चालवत असतो. मागच्या वर्षी लाँकडाऊन लागल्यामुळे माझे नुकसान झाले जवळपास तीन चार महिने कपडे विकता न आल्यामुळे माझ्यावर कर्ज झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com