Nanded : ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस

सरपंचासाठी ७२५, सदस्य पदासाठी तीन हजार ३२९ अर्ज
Gram Panchayat Election
Gram Panchayat Election sakal

नांदेड : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ता.२९ नोव्हेंबर ते ता.दोन डिसेंबर्यंत पार पडली. या वेळी सरपंचाच्या १८१ पदांसाठी ७२५ तर सदस्यांच्या एक हजार ३९१ जागांसाठी तीन हजार ३२९ अर्ज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले. सदर अर्जांची छाननी आज (ता. पाच) करण्यात येणार आहे. परंतु तत्पुर्वीच राजकीय पक्षांकडून मात्र सरपंच पदासाठी दमदार उमेदवारांचा शोध घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात थंडीच्या दिवसातच वातावरणात राजकीय गर्मी असल्याचे दिसून येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आॅक्टोबर २०२२ ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ता.नऊ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, धर्माबाद, उमरी, बिलोली, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा आणि देगलूर या १६ तालुक्यांतील तब्बल १८१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

सदर ग्रामपंचायतींसाठी ता.२८ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष नामनिद्रेशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याचे उमेदवार व मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. गावागावात पुढाऱ्यांनी पॅनल उभे केले असून जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान सरपंच व सदस्य पदांसाठी चार हजार ५४ अर्ज प्राप्त झाल्याने ईच्छुकांची भाऊगर्दी अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी स्पष्ट होणार लढतींचे चित्र

ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदांसाठी प्राप्त अर्जांची छाननी आज होत आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज ता.सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येणार आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान ता.१८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत करता येणार असून, मतमोजणी ता.२० डिसेंबर रोजी होत आहे.

आॅफलाईनमुळे वाढली संख्या

१८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ता.२८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस दिवस ता. दोन डिसेंबर असल्याने निवडणूक आयोगाने उमेदावारांना सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली. त्यासोबतच सर्व्हर डाऊनमुळे उमेदवारांना आॅपलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची सुद्धा सुट दिली. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी वाढल्याचे दिसून आले.

असे आहेत प्राप्त उमेदवारी अर्ज

तालुका ग्रामपंचायती सरपंच सदस्य

नांदेड सात ३३ १९२

अर्धापूर दोन सात २६

भोकर तीन १२ ५३

मुदखेड एक एक सात

हदगाव सहा २४ ९६

हिमायतनगर एक तीन १६

किनवट ५३ २०५ ९९३

माहूर २७ १०१ ४८३

धर्माबाद तीन आठ ३६

उमरी एक चार १६

बिलोली नऊ ३६ १५५

नायगाव आठ ४४ २४०

मुखेड १५ ७२ २४६

कंधार १६ ६६ २७३

लोहा २८ १०४ ४८५

देगलूर एक पाच १२

एकूण १८१ ७२५ ३३२९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com