esakal | नांदेड : धनादेशावर खाडाखोड करून दोन लाखांची फसवणूक करणारा ग्रामसेवक बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तीन दिवसात समक्ष खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फरार ग्रामसेवकाने आजपर्यंत काहीही खुलासा सादर केला नाही. 

नांदेड : धनादेशावर खाडाखोड करून दोन लाखांची फसवणूक करणारा ग्रामसेवक बेपत्ता

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : धनादेशावर खाडाखोड करून  ग्रामपंचायतला दोन लाखांचा चुना लावलेले गडग्याचे वादग्रस्त ग्रामसेवक एम. एम. पठाण यांनी चौकशीसाठी दप्तर तर उपलब्ध करून दिलेच नाही पण मासिक बैठकीलाही दांडी मारली. पठाण यांच्या उद्दामपणाला संतापलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली असून. तीन दिवसात समक्ष खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बेपत्ता ग्रामसेवकाने आजपर्यंत काहीही खुलासा सादर केला नाही. 

नायगाव तालुक्यातील गडगा ग्रामपंचायत ही सरपंच आणि ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचारामुळे प्रचंड बदनाम झाली आहे. गावच्या कारभाऱ्यांनी १४ व्या वित्त आयोगासह विकास निधीतही मोठा भ्रष्टाचार केला असल्याने यापूर्वी दोन वेळा झालेल्या चौकशीत बराच घोळ व गोंधळ झाल्यामुळे सरपंचासह पाच ग्रामसेवकवर गुन्हाही नोंद झालेला आहे. फसवणूकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही गावच्या कारभाऱ्यांना पैशाचा मोह सुटेनासा झाला आहे. नायगाव पंचायत समितीमध्ये नव्यानेच रुजू झालेले गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड हे स्वतःला कर्तव्यकठोर समजून घेत असतांनाही दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. 

हेही वाचा हिंगोली : सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

लातूर जिल्ह्यात राहून नायगाव तालुक्यातील गडगा ग्रामपंचायतचा कारभार बघणारे ग्रामसेवक एम. एम. पठाण  यांनी भामटेगिरी करुन ९६ हजाराच्या धनादेशावर २ लाख वाढीव रक्कम लिहून उचलून ग्रामपंचायतला चुना लावल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन लाखांचा चुना लावून फरार झालेल्या पठाण यांनी सरपंचाकडून सही घेतांना मोठा प्रामाणिकपणा दाखवला होता. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे करावयाची असल्याने ९६ हजाराची रक्कम उचलण्यासाठीच्या धनादेशावर सरपंचाची सही घेतली होती. किती रक्कम लिहीली आहे याची खात्री करुनच महीला सरपंचाने सही केल्यानंतर ग्रामसेवक पठाण यांनी ९६ हजाराच्या अगोदर २ लाख वाढवले व तेवढी रक्कम उचलली. 

या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी ता. ३१ आक्टोबर रोजी गडगा येथे पाठवले होते व चौकशीच्यावेळी पठाण यांना उपस्थित राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र  ग्रामसेवक तर उपस्थित नव्हते अभिलेखेही उपलब्ध करून दिली नाहीत त्यामुळे तपासणी आली नाहीत. त्याचबरोबर ता. २ नोव्हेंबर रोजीच्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाही दांडी मारली. ग्रामसेवक पठाण यांच्या या उद्दामपणाला संतापलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी ता. ३ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली असून सदर प्रकरणी तीन दिवसात समक्ष खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोटीस दिल्याच्या चार दिवसानंतरही खुलासा सादर केला नाही.  दोन लाखांच्या फसवणूक प्रकरणात पठाण हे सध्या फरारच असून खुलासा सादर करण्यासाठी व्हाटसपवर नोटीस बजावण्यात आली. दोन दिवस सुट्ट्या असल्याने सदर प्रकरणी सोमवारी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गडगा गावात विकास कामासाठी जवळपास सोळा लाखांची रक्कम प्राप्त झाली. विविध कामासाठी बँकेतून रक्कम ही उचलण्यात येत असल्याने यात नविन काहीच नव्हते. कालातंराने काही दिवसाच्या फरकानंतर उचलण्यात आलेल्या रक्कमेचा तपसील पहाता ९६ हजार उचलल्याची नोदंच नव्हती. त्या एवजी बारकाईने चौकशी केली असता २ लाख ९६ हजारा ची रक्कम उचलण्यात आल्याचे समोर आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे