नांदेड : समुह एकत्र आला आणि गावाने कात टाकली! 'कलंबर' झाले पाणीदार गाव

file photo
file photo

लोहा ( जिल्हा नांदेड ) : गावातील सर्व समस्येचं मूळ पाणी आहे. दुष्काळाने आर्थिक घडीच विस्कटून टाकली. पिण्यास पाणी व हातास काम नसल्यामुळे हजारो कामगार गाव सोडून परागंदा झाली. गावातील युवा वर्गानी परिस्थिती बदलण्याचा निश्चय केला. विविध ठिकाणी जाऊन माहिती घेतली संपर्क वाढवला. गावकऱ्यांनी यांञिकी कामात डिझेलचा खर्च केला. या कामात गावातील बाई- लेकींनी, बचतगट, बााल- गोपाळ आणि शेतकऱ्यांनी मोठे योगदान दिले.

पाणी फौंडेशनचे द्वितीय बक्षीसहीही मिळवले. बालाजी संगेवार, गंगाधर मैलारे, प्रवीण कचवा, ज्ञानेश्वर गोरे, दिलिप भोपळे, सुशीलकुमार मुक्कनवार, गजानन बोडकुळे, योगेश्वर गोरे, बालाजी गाजेवार, व्यंकटी तुप्पेकर, शेख शकील, केशव शिरोळे, सागर चंदेल, राहुल कळसे, सुरेश मोरे, सुभाष भुतेवाड, संतोष जाधव, कचरु निळकंठे, पिंटु तुप्पेकर, सचिन करडे, बालाजी सौराते आदी युवकांनी पुढाकार घेतला. पाणी फौंडेशन टीम यांनी या कामाचे योग्य नियोजन केले.

कलंबर परीसरात मार्चच्या शेवटी सुध्दा सगळीकडे हिरवेगार क्षेञ आहे. विहीरीची पाणी पातळी वाढली आहे. मुख्य पीक ऊस, उन्हाळी ज्वारी, भुईमुग तसेच भाजीपाला, जनावराना चारा, फळबाग असे अनेक पिके भरपुर प्रमाणात झाले आहे. त्यामुळे मजुरदारांना सुध्दा आपल्या भागात बारा महीने काम लागत आहे. परगावी जाण्याची गरज भासत नाही. केवळ 'पाणी अडवा आणि जिरवा' ची किमया आहे. एरवी पाऊस होऊन सुद्धा जेमतेम गव्हु, हरभरा  पिक अल्प प्रमाणात यायचे. केवळ गरज आहे ती शेतीतील पिकांना लागणारे पाणी योग्य नियोजनाद्वारे वापरण्याची.  

"आज गावात फळबाग लागवड करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे मजुरांचे स्थलांतर थांबले आहे. अधिक क्षेत्रावर ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला जात आहे. हे सर्व सामूहिक प्रयत्नानेच शक्य झाले आहे. शेतकरी उत्पादक कंपनी व बचतगट उद्योग या वर भर देण्यात येत आहे."
- डॉ. राजकुमार मुककनवार 

"गावाला माथा भागात वनविभागाची गायरान खूप आहे. तेथे काम केले तरच गावातील पाण्याची पातळी वाढेल. तत्कालीन जिल्हा वन अधिकारी आशिष ठाकरे यांच्याशी गावकऱ्यांची बैठक झाली. सर्व परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली त्यांनी तात्काळ परवानगी तर दिलीच व वनविभागामार्फत वनतळे, खोल चर पद्धतीत कामे पूर्ण केली."

- दीपक मोरताळे, जलनायक.

संपादन- प्रल्हाद कांबळे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com