Nanded : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७१७ कोटी मंजूर

खासदार चिखलीकर; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
MP Pratap Patil Chikhalikar
MP Pratap Patil Chikhalikaresakal

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप आणि बागायती पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ७१७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

यावर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवातच शेतकऱ्यांसाठी कष्टदायी होती. खरीपाची पिके जोमात आली असताना जुलै महिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचे नुकसान झाले. पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. सात लाख ४० हजार ८५८ शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले.

शेतकऱ्यांना मावेजा मिळवून देण्यासाठी शासन, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत, विनाविलंब प्रशासनाकडे पाठवावेत, यासाठी खासदार चिखलीकर यांनी पाठपुरावा करत अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला.

शेतकऱ्यांना मानसिक बळ देत असतानाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. शासनाने जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला असून जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७१७ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ता. १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचे पैसे जमा होतील, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com