esakal | नांदेड : महामार्ग पोलिस भलत्याच कामात व्यस्त, रस्त्यावरील खड्ड्यांच्या लागले मागे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एरव्ही वाहनधारकांना सळोकी पळो करुन सोडणारे पोलिस आता वाहनधारकांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे.

नांदेड : महामार्ग पोलिस भलत्याच कामात व्यस्त, रस्त्यावरील खड्ड्यांच्या लागले मागे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी हे मुख्य काम बाजूला ठेवून भलत्याच व नको त्या कामात हस्तक्षेप करुन आपण खूपच कर्तव्य दक्ष आहोत असे दाखविण्याचा केवीलवाना प्रकार केल्या जात आहे. एरव्ही वाहनधारकांना सळोकी पळो करुन सोडणारे पोलिस आता वाहनधारकांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. त्यांच्या या गांधीगीरीबद्दल सार्वजनीक बांधकाम विभागाकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. 

राज्यातील काही महत्वाच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यात नांदेड- नागपूर- तुळजापूर या महामार्गाच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी केंद्रसरकारने कामाचे कंत्राट काढून कामे सुरु केले आहेत. परंतु काही दिवसांपासून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. खरे तर हे काम सार्वजनीक बांधकाम विभागाचे आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेच हे खआते आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे काही बिजविल्या जात नाहीत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ही बाब समोर करुन मागील आठवड्यात माहमार्ग पोलिसांनी पालकमंत्री श्री. चव्हाण यांना एका पत्राद्वारे कळविले होते. परंतु त्यावर काही अंमल झाला नाही. 

हेही वाचा मुदखेड : पिस्तुलचा धाक दाखवून सराफाला लुटणारे पोलिस कोठडीत

थातूरमातूर खड्डे बुजवणाऱ्या कंत्राटदारांना कोणाचा आशीर्वाद

नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत. गुत्तेदार येत आहेत खड्डे बुजवत आहेत. पण खड्डे काय बुजले जात नाहीत. या रस्त्यावरील थातूरमातूर खड्डे बुजवणाऱ्या कंत्राटदारांना कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळए लहान वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच महामार्ग पोलिसांना एखाद्या वाहनाचा पाठलाग करण्यास अडथळा येत असल्याने पोलिसांनी चक्क आपल्याच हाती फावडे, टोपले घेऊन खड्डे बुजविण्याचे काम केले आहे. खड्डे पोलिसांनी बुजविल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. एरव्ही वाहनधारकांना नको त्या कारणावरुन त्रास देणारे महामार्ग पोलिस आता त्यांच्या मदतीसाठी कसे काय पुढे आले हा चर्चेचा विषय ठरला आहे.

येथे क्लिक करा - शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्य़ा लोकांच्या शोधासाठी विशेष पथक नेमा, खंडपीठाचे पोलिस महासंचालकांना आदेश. -

अपघातस्थळी वेळेवर पोचुन जखमीना रुग्णालयात दाखल करणे अपेक्षीत

नांदेड- नागपूर ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर आसना ब्रिज- नांदेड ते वारंगा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात माती मिश्रित मुरुम व चुरी भरून ओबड-धोबड दुरुस्ती केली जात असून हे बुजवलेले खड्डे दोन-तीन दिवसात पुन्हा जशास तसे होत आहेत. महामार्ग पोलिसांनी आपेल मुख्य काम बाजूला ठेवून नको त्या कामात लक्ष घातल्याने सार्वजनीक बांधकाम विभागात वेगळ्याच चर्चेला उधान येत आहे.  या रस्त्यावर एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी कधीच वेलेवर पोलिस पोचत नाहीत. त्यामुळे अनेकांना उपचाराविना आपला प्राण गमवावा लागत आहे. या कामात जर पोलिसांनी तप्तरता दाखविली तर नक्कीच त्यांच्या कामाची दखल समाज घेतल्याशिवाय राहणार नाही.